शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

संघाच्या ‘सोशल’ प्रोफाईलवर तिरंगा, पहिल्यांदाच बदल केल्यामुळे सर्वत्र चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 06:23 IST

आरएसएसचे प्रचार विभागाचे सहप्रभारी नरेंद्र ठाकूर यांनी सांगितले की, ‘संघ आपल्या सर्व कार्यालयांवर राष्ट्रध्वज फडकावून स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहे.’

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) स्वातंत्र्य दिनापूर्वी शुक्रवारी आपल्या सर्व सोशल मीडिया खात्यांवरील प्रोफाईल पिक्चर बदलले आहेत. या खात्यांवरील भगवा ध्वज हटवून तिरंगा ध्वज लावण्यात आला आहे.

आरएसएसने पहिल्यांदाच असा बदल केल्यामुळे याबाबत सर्वत्र चर्चा होत आहे. केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ मोहीम घोषित केल्यानंतर विरोधी पक्षांनी आरएसएसवर हल्ला केला होता. आरएसएस प्रमुख मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी आपल्या सोशल मीडिया खात्याच्या डीपीवर तिरंगा ध्वज लावला आहे. आरएसएसचे प्रचार विभागाचे सहप्रभारी नरेंद्र ठाकूर यांनी सांगितले की, ‘संघ आपल्या सर्व कार्यालयांवर राष्ट्रध्वज फडकावून स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहे.’ स्वातंत्र्याला ७५ वर्षे  पूर्ण होत असल्याबद्दल सरकार स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहे.

विरोधकांनी उपस्थित केला होता सवाल‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत आरएसएस आपल्या सोशल मीडिया खात्यांवर तिरंगा ध्वज कधी लावणार, असा सवाल विरोधी पक्षांकडून केला जात होता. त्यावर आरएसएसचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी बुधवारी टीकेला उत्तर देताना म्हटले होते की, अशा बाबींचे राजकारण व्हायला नको. ‘हर घर तिरंगा’ आणि ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ या दोन्ही कार्यक्रमांना आरएसएसने याआधीच समर्थन दिले आहे.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ