शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रालयातील बैठक निष्फळ; दुधाला ३० रुपये दरही देणार नाही, खासगी कंपन्यांची भूमिका

By संतोष भिसे | Updated: July 12, 2024 15:12 IST

आंदोलन सुरूच ठेवण्याचा संघर्ष समितीचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : दूध दरासाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनावर तोडग्यासाठी मंत्रालयात गुरुवारी आयोजित तिसरी बैठकदेखील कोणत्याही ठोस निर्णयाविना संपली. दुधाला ३० रुपये दरही देणार नसल्याची भूमिका खासगी कंपन्यांनी घेतली, त्यामुळे आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.

दुधाला प्रतिलिटर ४० रुपये भाव मिळावा व दराचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी दुधाला किमान हमी भावाची मागणी समितीने केली आहे.समितीतर्फे सदाशिव साबळे, विनोद देशमुख, प्रकाश देशमुख, निलेश तळेकर व नामदेव साबळे या पाचजणांचे शिष्टमंडळ बैठकीसाठी उपस्थित होते. राज्यभरातील अन्य काही शेतकरी संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये राज्यभरातील दूध संघ, दूध कंपन्या व पशुखाद्य कंपन्यांचे प्रतिनिधी हजर होते.

दुधाच्या वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर किमान ४० रुपये प्रतिलिटर भाव देण्याची मागणी समितीने केली. पशुखाद्याचे दर कमी करावेत व दूध प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी दुधाला रास्त व किफायतशीर भाव (एफआरपी) द्यावा अशी आग्रही मागणी समितीच्या प्रतिनिधींनी केली. साबळे म्हणाले, अनुदानाचा घोळ घालून शेतकऱ्यांना यापुढे अधिक काळ फसवता येणार नाही. निवडणुका संपल्या की अनुदान बंद होईल, पुन्हा येरे माझ्या मागल्या हीच परिस्थिती दूध उत्पादकांसमोर निर्माण होईल. अटी व शर्तींच्या माध्यमातून दूध उत्पादकांना अनुदानापासून वंचित ठेवले जाईल. असे होऊ नये यासाठी अनुदानाऐवजी उत्पादन खर्चावर किमान ४० रुपये प्रति लिटर भाव द्यावा. या माध्यमातून हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा.

आंदोलन तीव्र करणार

समितीच्या या भूमिकेला खासगी दूध कंपन्यांनी तीव्र विरोध केला. दुधाला ३० रुपयेदेखील दर देता येणार नाही अशी भूमिका मांडली. त्यामुळे बैठकीत तोडगा निघू शकला नाही. समितीने दूध आंदोलन सुरु ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, पुणे, संभाजीनगर आदी जिल्ह्यांत आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशारा दिला. समितीचे समन्वयक डॉ. अजित नवले, किसान सभेचे अध्यक्ष उमेश देशमुख आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत.

टॅग्स :Mantralayaमंत्रालयmilkदूध