शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

टेम्पो चालकाचा मुलगा आला MPSCमध्ये राज्यात पहिला; एका गुणाने हुकली हाेती संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 08:24 IST

सांगलीच्या प्रमाेद चाैगुलेच्या कष्टाला आले यश

पुणे/मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी)घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून सांगलीचा प्रमोद चौगुले याने राज्यात प्रथम क्रमांक पटवकला आहे. आयोगाने पात्र विद्यार्थ्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम शुक्रवारी (दि.२९)संपवला आणि त्यानंतर काही तासातच परीक्षेचा निकाल जाहीर केला. आयोगाच्या इतिहासात प्रथमच एवढ्या गतिमानतेने निकाल जाहीर झाला आहे.त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

एमपीएससीतर्फे २०० पदांसाठी २१ मार्च २०२१ रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर पात्र उमेदवारांची मुख्य परीक्षा परीक्षा ४ ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत घेतली गेली. त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती एप्रिल महिन्यात घेतल्या जात होत्या. शुक्रवारी मुलाखतीचा शेवटचा दिवस होता. मुलाखती झाल्यानंतर अवघ्या काही तासांत आयोगाने अंतिम निकाल जाहीर केला. त्यात प्रमोद चौगुले याने प्रथम, नितेश कदम याने द्वितीय, रुपाली माने हिने तृतीय तर शुभम जाधव आणि अजिंक्य जाधव यांनी अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक पटकवला आहे.

कोरोनामुळे या परीक्षेला विलंंब झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण होते. परंतु, डिसेंबरमध्ये मुख्य परीक्षा झाल्यावर एप्रिल महिन्यात मुलाखती झाल्या. मुलाखतीनंतर तीन-चार महिन्यांनी निकाल जाहीर केला जातो. मात्र,आयोगाने काही तासाच निकाल जाहीर केला. त्यामुळे उमेदवारांना मोठा धक्का बसला. आयोगाच्या संकेतस्थळावर राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.

एका गुणाने हुकली हाेती संधी

गेल्या राज्यसेवा परीक्षेत माझी एका गुणाने संधी हुकली होती.त्यामुळे पुन्हा जोमाने अभ्यास केल्यावर मला हे यश मिळाले. मी बी.ई.मॅकॅनिकल असून भारत पेटोलियम कंपनीत चार वर्षे काम केले आहे. युपीएससीचीबरोबरच मी एमपीएससीची तयारी करत होतो. माझे वडील टेम्पो चालक असून आई गृहिणी आहे. - प्रमोद चौगुले 

मेहुण्यानंतर दाजीची बाजीएमपीएससीच्या मागील राज्यसेवा परीक्षेत प्रसाद चौगुले यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. यंदा प्रमोद चौगुले यांची प्रथम क्रमांक मिळवला. प्रसाद चौघुले हे प्रमोद चौगुले यांचे मेहुणे आहेत. त्यामुळे मेहुण्यानंतर दाजींनी राज्यात अव्वल क्रमांक पटकवला,अशी चर्चा निकालानंतर रंगलेली दिसून आली.