शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांचे आज्ञापत्र कालातीत, राजकर्त्यांना उपयुक्त; राज्य कारभारात अंमल केला तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 13:35 IST

अभ्यासक, संशोधकांनी गड-किल्ले, आरमार, प्रजा आदी पैलूंवर टाकला प्रकाश

भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्य नगरी उदगीर (जि. लातूर) : छत्रपती शिवरायांचे आज्ञापत्र हे कालातीत आहे. कोणत्याही काळात, कोणत्याही राज्यकर्त्यांना ते उपयुक्त ठरणारे आहे. राजकारण्यांनी हे आज्ञापत्र बारकाईने वाचून तसा अंमल राज्य कारभारात केला तर नक्कीच प्रजाहित साधले जाऊ शकते, असा सूर अभ्यासकांनी रविवारी चर्चेतून काढला.

साहित्य संमेलनातील छत्रपती शाहू महाराज सभामंडपात रविवारी सकाळी आज्ञापत्र या ग्रंथावर चर्चा झाली. यात अभ्यासक अविनाश कोल्हे, राजा दीक्षित, सुरेश शिंदे, गणेश मोहिते यांनी सहभाग घेतला. या चर्चेतून छत्रपती शिवरायांनी गड, किल्ले, कडे, आरमार, प्रजा, शेतकरी यासह विविध घटकांच्या बाबतीत अत्यंत बारकाईने अभ्यासपूर्वक काढलेल्या आज्ञापत्रांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यात आली. अगदी आज्ञापत्रातील भाषेचे सौंदर्यही येथे अधोरेखित करण्यात आले. प्रजाहित साधण्यासाठी, राज्य कारभार हाकण्यासाठी महसुलाचे महत्त्व जाणून भूमिदानाबाबत त्यांनी घालून दिलेली तत्त्वे आजच्या काळातही अत्यंत उपयुक्त असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. 

दिव्याची वात उंदीर नेतील, गंजी जाळतील...छत्रपती शिवरायांनी शेतकऱ्यांची किती काळजी घेतली होती, हे दिव्यांच्या उदाहरणावरून स्पष्ट होते. आपल्या आरमारास ते रात्री झोपताना दिवे बंद करण्यास आज्ञापत्रातून सांगत. दिवा चालू ठेवल्यास उंदीर वात पळवतील व शेतकऱ्यांच्या गंजीवर टाकतील. गंजी जळाल्यास शेतकऱ्यांचे वर्षभराचे धान्य नष्ट होईल, इतका बारकावा यातून दिसतो. भाजीच्या देठालाही हात लावू नका, हे सांगणेही या काळजीचेच प्रतीक. आजच्या राज्यकर्त्यांनी इतक्या बारकाव्याने शेतकऱ्यांची काळजी घेतल्यास आत्महत्या थांबतील, असा सूरही अभ्यासकांनी काढला.