शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक निवडणुका घेण्याचे अधिकार राज्य सरकारकडे; विधेयकावर राज्यपालांनी केली स्वाक्षरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 07:25 IST

राज्याचे अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि इतर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. त्यानंतर राज्यपालांनी सही केली. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मध्यप्रदेशच्या धर्तीवर राज्य सरकारने आणलेल्या निवडणूक सुधारणा विधेयकावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी सही केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभागरचनेचे, तसेच निवडणुका घेण्याचे अधिकार या विधेयकामुळे राज्य सरकारकडे येणार आहेत.  त्यामुळे ओबीसी राजकीय आरक्षणावरून निर्माण झालेल्या कोंडीतून सरकारची एका अर्थाने सुटका झाली आहे. 

 राज्याचे अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि इतर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. त्यानंतर राज्यपालांनी सही केली. 

 ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा न्यायप्रविष्ट असला तरी तो सोडवण्यासाठी मदत व्हावी यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भातील विधेयक आणले होते. दोन्ही सभागृहांत ते संमत करण्यात आले.राज्यपालांची सही झाल्याने ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता किमान सहा महिने निवडणूक घेता येणार नाही, इम्पिरिअल डेटा आम्ही तीन महिन्यांत गोळा करू, अशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

काय झाले?या विधेयकामुळे आगामी महापालिका, नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभागरचना ठरविण्याचा, निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळणार आहे. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्याने राजपत्र होईल. यानंतर राज्य निवडणूक आयोग याबाबत दखल घेईल. 

टॅग्स :Electionनिवडणूकbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी