शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा

By संतोष आंधळे | Updated: May 29, 2024 05:59 IST

अधीक्षकांच्या हाताखाली अधिकाऱ्यांची फौज, अधीक्षकाचे अधिकार काय असतील, वाचा...

संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयातील महत्त्वाचे मानले जाणारे वैद्यकीय अधीक्षक पद हे आता वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार आहे. त्यामुळे अधिष्ठातांच्या अधिकारांवर गदा आल्याचे सध्या वैद्यकीय वर्तुळात बोलले जात आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षक पद हे अधिष्ठातांच्या मर्जीनुसार भरण्यात येेत होते. त्या पदावर अनेकवेळा सहयोगी प्राध्यापक असणाऱ्या अध्यापकांना देण्यात येत होते. मात्र, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नियमानुसार वैद्यकीय अधीक्षक पद हे प्राध्यापक दर्जाच्या अध्यापकाला देणे बंधनकारक असताना नियमाची पायमल्ली करून हे पद कुणालाही देण्यात येत होते. त्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाची परवानगी घेण्याची गरज नव्हती.

वैद्यकीय शिक्षण विभागाने वैद्यकीय अधीक्षक पद हे प्राध्यापक संवर्गातून भरण्यात येते. प्राध्यापक हे  गट - अ पद असून, त्या  पदाचे ‘नियुक्ती प्राधिकारी’ हे शासन असल्यामुळे त्या पदाची नियुक्ती किंवा अतिरिक्त कार्यभाराचा आदेश शासन स्तरावरून काढणे अपेक्षित आहे. त्यामुळे यापुढे अधीक्षक पदावरील व्यक्तीची नियुक्ती असल्यास वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांमार्फत प्रस्ताव शासनास सादर करावे, या आशयाचे पत्र काही दिवसांपूर्वीच काढण्यात आले आहे तसेच त्या राज्यातील सर्व अधिष्ठातांना पाठविण्यात आले आहे.       

सध्याच्या घडीला राज्यात २५ वैद्यकीय महाविद्यालय कार्यरत असून, प्रत्येक ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक पद आहे. रुग्णालयात अधिष्ठातांच्या नंतर सर्वांत महत्त्वाचे पद हे  अधीक्षकाचे आहे. बहुतांश वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालयाची सर्व जबाबदारी अधीक्षकांकडे असते. रुग्णालयाचे व्यवस्थापन, रुग्ण व्यवस्था, रुग्णालय परिसरातील संपूर्ण वैद्यकीय व्यवस्था, रुग्णाशी संबंधित सगळ्या गोष्टी त्यामध्ये रुग्णालयातील सर्व वॉर्ड्सचे प्रश्न हे अधीक्षक बघत असतात. रुग्णालयात आयोजित केल्या जाणाऱ्या सर्व कार्यक्रमांची जबाबदारी अधीक्षक कार्यालयाकडेच असते.

हे ठरविणार अधीक्षक

वैद्यकीय शिक्षण विभागाने सर्व अधिष्ठातांना अधीक्षक पद शासन स्तरावरून भरणार असल्याचे पत्र पाठविण्यात आले आहे. त्यानंतर आता रुग्णालयाचे अधीक्षक पद हे आता मंत्री कार्यालयातून भरले जाणार असल्याची जोरदार चर्चा सध्या डॉक्टरांमध्ये रंगताना पाहायला मिळत आहे.

अधीक्षकांच्या हाताखाली अधिकाऱ्यांची फौज

रुग्णालयातील व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्हावे, याकरिता वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येते. यापैकी हे सर्व अधिकारी हे अधीक्षकांच्या सूचनेनुसार काम करत असतात. अतितत्काळ विभागात वैद्यकीय अधिकारी तीन पाळ्यांमध्ये काम करत असतो. रुग्णालयात येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या आरोग्य तपासणीसाठी हे अधिकारी अनेकदा काम करताना आढळतात.

टॅग्स :Medicalवैद्यकीयdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल