शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीचे फोडाफोडीचे राजकारण जनतेला रुचलेले नाही - एकनाथ खडसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 11:32 IST

भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असलेल्या एकनाथ खडसेंची आगपाखड; महायुतीला फटका बसण्याचा दावा

जळगाव : राज्यात महायुतीपेक्षा महाविकास आघाडीच्या जागा जास्त येत असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. याचा अर्थ महायुतीच्या माध्यमातून झालेले फोडाफोडीचे राजकारण हे जनतेला रुचलेले नाही, असा दावा आमदार एकनाथ खडसे यांनी रविवारी केला.  शरद पवार गटातून बाहेर पडलेल्या खडसे यांनी  भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते. तसेच त्यांनी भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांचा प्रचारही  केला होता. मात्र, आता खडसेंनी महायुतीला टार्गेट केल्याने ते पुन्हा भूमिका बदलणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. 

नेमके काय म्हणाले खडसे? लोकसभा निवडणुकीसाठी एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. त्यात राज्यात महायुतीपेक्षा महाविकास आघाडीच्या जास्त जागा येत असल्याचे खडसे म्हणाले. राज्यातील जनतेला महायुतीच्या माध्यमातून झालेले फोडाफोडीचे राजकारण आवडलेले नाही. तसेच, कापूस व सोयाबीनला न मिळालेला दर या कारणांमुळेही महायुतीच्या जागा कमी येत असल्याचे निरीक्षण खडसे यांनी नोंदविले.   

राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही संभ्रमात... भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताना, भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनीही खडसेंसोबत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर, आता शरद पवार गटाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर खडसे  भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. जे पदाधिकारी खडसेंसोबत राष्ट्रवादीत आले होते. ते अजूनही शरद पवार गटातच आहेत.मात्र, एकनाथ खडसे हे शहरात आल्यानंतर किंवा काही ठिकाणी आल्यानंतर शरद पवार गटाचे अनेक पदाधिकारी त्यांच्यासोबत असतात. त्यामुळे खडसे नेमके कोणत्या पक्षात जातील किंवा थांबतील, याबाबत शरद पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था असल्याचे चित्र आहे. 

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसे