शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय प्राध्यापकांच्या वयाचा मुद्दा आता मुख्यमंत्र्यांच्या दारी, सेवानिवृत्ती परिपत्रक मागे घेण्याची मागणी कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 06:37 IST

भूलतज्ज्ञ विभागातही भरती झालेली नाही. पालिका रुग्णालयांच्या बाजूला मल्टिस्पेशालिटी रुग्णालये आहेत,  अनेकदा शस्त्रक्रियांसाठी खासगी रुग्णालयात पाठवले जाते.

मुंबई : सेवानिवृत्तीबाबत काढलेले परिपत्रक मागे घेऊन त्याचे वय ६२ करावे, या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांतील प्राध्यापक आणि डॉक्टरांनी एकत्र येत आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. या आंदोलनात सुमारे ६० हून अधिक डॉक्टर - प्राध्यापकांनी सहभाग घेतला.  मात्र, पालिका  कोणतीही हालचाल करत नसल्याचे दिसल्यानंतर प्राध्यापक - डॉक्टरांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे. तसेच पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांचीही भेट घेतली.

भूलतज्ज्ञ विभागातही भरती झालेली नाही. पालिका रुग्णालयांच्या बाजूला मल्टिस्पेशालिटी रुग्णालये आहेत,  अनेकदा शस्त्रक्रियांसाठी खासगी रुग्णालयात पाठवले जाते.  रुग्णालयाची दयनीय अवस्था होण्यामध्ये अधिष्ठाता व संचालक जबाबदार असल्याचेही दावे होत आहेत.   केईएममध्ये गेली १२ वर्षे जिवंत दात्यांचे प्रत्यारोपण बंद आहे.  येथे प्रत्यारोपण सुरू व्हावे, यासाठी कोणीही प्रयत्नशील नाही असा आरोप केला जात आहे. या प्रमुख रुग्णालयांचे नेतृत्व दंत शाखेच्या पदवीधर करत आहेत. जगात कुठेही अशा प्रकारचा नियम नाही, अशी माहिती डॉ. रविंद्र देवकर यांनी दिली.

चार प्रमुख मागण्याडॉक्टरांसह प्राध्यापकांच्या चार प्रमुख मागण्या आहेत. त्यात २८ फेब्रुवारी रोजीच्या  परिपत्रकानुसार प्राध्यापक, डॉक्टरांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ करावे. अधिष्ठाता, संचालक आणि विभागप्रमुखांच्या जागा भराव्यात. तसेच, रिक्त सर्व पदे लवकर भरावीत आदी मागण्या असल्याचे शिक्षक संघटनेने सांगितले.

इच्छुक शिक्षक पदोन्नतीपासून दूर जाण्याची भीतीअनेक शिक्षकांनी पदोन्नतीसाठी आवश्यक असलेले पात्रतेचे निकष पूर्ण केले आहेत. यामुळे, सहायक पदावर कार्यरत असलेले अनेक तरुण, मेहनती, उत्साही आणि सर्वोत्तम सेवा देण्यास इच्छुक असलेले प्राध्यापक हे पदोन्नत्तीपासून दूर फेकले जातील, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. तर, काही विशिष्ट डॉक्टरांसाठी वेळोवेळी प्राध्यापक डॉक्टरांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यात आले असल्याचा आरोप डॉक्टर करत आहेत. यापूर्वी डॉक्टरांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० नंतर ६२ करण्यात आले.

... तरीही प्राध्यापकांची भरती नाहीसातपेक्षा अधिक वर्षे उलटूनही सहायक प्राध्यापकाची भरती केली नाही. अनेक पालिका रुग्णालयांची अवस्था अवस्था मोडकळीस आली आहे.  पालिका प्रशासनासह राज्य शासनाकडून काही हालचाल न झाल्यास लवकरच पुढील भूमिका जाहीर करू.- डॉ रवींद्र देवकर, शिक्षक संघटनेचे सचिव, केईएम रुग्णालय १२ वर्षे प्रत्यारोपण बंद 

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसे