शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

औरंगजेब कबरीचा मुद्दा आता समयोचित नाही, रा. स्व. संघाची भूमिका : आंदोलकांचे टोचले कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 06:52 IST

औरंगजेबाचा मुद्दा समयोचित नाही अशी भूमिका संघाने मांडली आहे...

नागपूर : राज्यभरात औरंगजेबाची कबर काढण्यावरून आंदोलने झाली. नागपुरात तर न भूतो न भविष्यति अशी जाळपोळ तसेच दगडफेक झाली. या मुद्द्यावरून राजकारण तापले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्यांचे कान टोचले आहेत. औरंगजेबाचा मुद्दा समयोचित नाही अशी भूमिका संघाने मांडली आहे.

खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर शासनाने लवकरात लवकर काढावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. नागपूरसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सोमवारी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांनी या मागणीसाठी आंदोलन केले. जनतेची भावना लक्षात घेऊन राज्य शासनाने तातडीने या दिशेने पावले उचलावी, अशी भूमिका विहिंपतर्फे मांडण्यात आली आहे.

बंगळुरूत संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांना विचारणा केली असता त्यांनी औरंगजेबाचा मुद्दा समयोचित नाही असे स्पष्ट केले. कुठल्याही प्रकारची हिंसा ही समाजासाठी एकूण प्रकृतीसाठीच योग्य नाही. नागपुरातील जाळपोळ व दंगल प्रकरणात पोलिसांनी आवश्यक कारवाई केली असून सूत्रधारांचा शोध सुरू आहे. ते आरोपी शोधतील. मात्र समाजात सामाजिक सौहार्द राहिले पाहिजे हीच संघाची भूमिका आहे. अशा प्रकारची हिंसा व्हायलाच नको, असेदेखील आंबेकर यांनी स्पष्ट केले.

फहीम खानकडे शंकेची सुईनागपूर हिंसाचार प्रकरणात लोकसभेची निवडणूक लढविलेल्या मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी शहराध्यक्ष फहीम खान शमीम खानवर पोलिसांची संशयाची सुई आहे. पोलिसांनी फहीम खानला ताब्यात घेतले असून, विविध बाजूंनी चौकशी सुरू आहे. फहीम खानविरोधात अगोदरपासूनच विविध प्रकारचे सहा गुन्हे दाखल आहे. हे गुन्हे २००९, २०२२, २०२३ या वर्षांत दाखल झाले होते. यात लैंगिक शोषणाचादेखील गुन्हा दाखल होता. लोकसभा निवडणुकीत त्याला १ हजार ७३ मते मिळाली होती.

बाराशेहून अधिक आरोपी : नागपूर हिंसाचारात पोलिसांनी बाराशेहून अधिक जणांना आरोपी केले. त्यात अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. आरोपींनी महिला पोलिसांचा विनयभंग करत पेट्रोल बॉम्बदेखील फेकल्याची बाब समोर आली आहे.  

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ