शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात बालमृत्यूदराचा आलेख घटला; महाराष्ट्राची कामगिरी समाधानकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 07:17 IST

जन्मापासून वर्षभरात झालेल्या मृत्यूला बालमृत्यू म्हणतात. विविध कारणाने तसेच कुपोषणाने बालमृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे

पुणे : अर्भक मृत्यू, नवजात शिशुमृत्यू व बालमृत्यूमध्ये महाराष्ट्र राज्याची कामगिरी समाधानकारक असून, राज्याचा बालमृत्यूदर गेल्या दशकभरात सातत्याने घटत आहे. सॅम्पल रजिस्ट्रेशन सर्व्हेच्या गेल्या काही वर्षांच्या अहवालानुसार ही बाब समोर आली आहे.

बाळ जन्मल्यापासून ३० दिवसांच्या आत त्याचा मृत्यू झाला असेल, तर त्याला अर्भकमृत्यू म्हणतात. अतिसार, स्तनपानाअभावी रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने व बालरोगतज्ज्ञांचा सल्ला न पाळल्यास नवजात अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते; परंतु यामध्ये सातत्याने घट होत आहे, अशी माहिती राज्याच्या कुटुंब कल्याण विभागाने दिली.

जन्मापासून वर्षभरात झालेल्या मृत्यूला बालमृत्यू म्हणतात. विविध कारणाने तसेच कुपोषणाने बालमृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. मात्र, ही आकडेवारी सातत्याने घटत आहे. त्याचप्रमाणे नवजात मृत्यू कमी होत आहे.

भारतापेक्षा राज्याचा मृत्यूदर कमीसॅम्पल रजिस्ट्रेशन सर्व्हेनुसार भारताचा नवजात शिशू मृत्यूदर हा २२, तर महाराष्ट्र राज्याचा १३ आहे. तसेच ५ वर्षांखालील बालमृत्यूचा दर देशाचा ३५ असून, महाराष्ट्राचा २१ आहे. तसेच अर्भक मृत्यूदर हा २८ असून, महाराष्ट्राचा १६ आहे.

केरळचा मृत्यूदर सर्वात कमीअर्भक मृत्यू दरामध्ये महाराष्ट्र राज्याचा देशातील ४ क्रमांक आहे. सन २०२० च्या अहवालानुसार अर्भक मृत्यू दरामध्ये केरळ राज्याचा दर ६, दिल्लीचा १२, तमिळनाडूचा १३ तर महाराष्ट्राचा १६ आहे.

नवजात शिशू स्थिरीकरण कक्ष, बाल उपचार केंद्र, पोषण पुनर्वसन केंद्र, घरच्या घरी नवजात शिशूची काळजी, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, ॲनिमियामुक्त भारत, जननी सुरक्षा योजना, जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम, मानव विकास कार्यक्रम, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान व नवसंजीवनी योजना याद्वारे हा मृत्यूदर कमी होत आहे.    - डॉ. नितीन अंबाडेकर, आरोग्य संचालक