शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

४५ लाखांची शिष्यवृत्ती मिळविणारा देशातील पहिला वकील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 09:36 IST

कोरपन्याचा दीपक चटप ठरला ब्रिटिश सरकारचा ‘चेव्हनिंग ग्लोबल लीडर’

चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील लखमापूर येथील शेतकरी कुटुंबातील ॲड. दीपक यादवराव चटप हा ब्रिटिश सरकारचा ‘चेव्हनिंग ग्लोबल लीडर’ ठरला असून ‘चेव्हनिंग’ या जागतिक प्रतिष्ठेच्या ४५ लाखांच्या शिष्यवृत्तीचा मानकरी झाला आहे. अवघ्या २४ व्या वर्षी ही शिष्यवृत्ती मिळविणारा तो देशातील पहिला तरुण वकील आहे. 

सामाजिक नेतृत्व करू इच्छिणाऱ्या जगभरातील युवकांना ब्रिटिश सरकार शिष्यवृत्ती देते. लंडनच्या ‘सोएस’ या सर्वोत्तम विद्यापीठात उच्चशिक्षणासाठी  ॲड. दीपक चटप याची निवड झाली.  ॲड. चटप हा ‘पाथ’ या सामाजिक संस्थेचा संस्थापक असून, या दुर्बल घटकांच्या  प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करत आहे. शेतकरी नेते ॲड. वामनराव चटप, पद्मश्री डॉ. अभय बंग, ॲड. असीम सरोदे व  माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत सामाजिक व विधिविषयक केलेले दीपकचे काम दखलपात्र ठरले. 

...अशी आहे कौटुंबिक पार्श्वभूमी ॲड. दीपक चटप यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गडचांदूर येथे केले, तर पुण्यातून ते एलएलबी झाले. शिक्षण घेताना मुंबई येथील अरबी समुद्रातील प्रदूषणाची याचिका राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात दाखल केली. शेतकरी आत्महत्येविषयक मानवाधिकार आयोगात  अनेक तक्रारी दिल्या. ‘लढण्याची वेळ आलीय’ हा काव्यसंग्रह आणि ‘कृषी कायदे : चिकित्सा व न्यायाधिकरणाची गरज’ ही दोन पुस्तके लिहिली. कोरो इंडिया फेलोशिपद्वारे संविधानिक हक्कांवर ते काम करीत आहेत.

लखमापूर ते लंडन हा प्रवास सोपा नव्हता. मात्र, कुटुंब व मित्रांनी खंबीर साथ दिल्याने ब्रिटिश सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरू शकलो. लंडनमध्ये उच्चशिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतात परत येऊन शेतकरी, आदिवासी व दुर्बल घटकांच्या न्याय्यहक्कांसाठी कार्य करणार आहे. -ॲड. दीपक चटप, लखमापूर, जि. चंद्रपूर