शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

आला थंडीचा महिना..! स्वेटर, कानटोप्या काढा! राज्यात १०, मुंबईचा पारा १६ अंशांपर्यंत घसरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 13:36 IST

नागरिकांना नोव्हेंबर महिन्यात थंडी अनुभवता येईल

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ऑक्टोबर महिना पावसाच्या सरींत गेल्यानंतर आता नोव्हेंबर थंडी घेऊन येणार आहे. हिमालयातील हवामान बदलामुळे दक्षिण भारताकडे शीत वारे वाहू लागले असून, शनिवारपासून बुधवारपर्यंत मुंबईचे किमान तापमान १६ तर, राज्याचे १० अंश सेल्सिअसपर्यंत उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीनंतर का होईना हुडहुडी भरण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. बंगालच्या उपसागरात आलेले मोंथा चक्रीवादळ आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातले. त्यामुळे नागरिकांना ऑक्टोबर हीटचे चटके बसले नाहीत. हा महिना सुखावह गेला असतानाच त्यात आणखी भर पडणार असून, नागरिकांना नोव्हेंबर महिन्यात थंडी अनुभवता येईल.

गुरुवारी जारी केलेल्या आयएमडीच्या विस्तारित श्रेणीच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात येत्या २ आठवड्यांत म्हणजे ७-२० नोव्हेंबरदरम्यान किमान आणि कमाल तापमान सामान्यापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.- कृष्णानंद होसाळीकर, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ

हिमालयात बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे थंड वारे दक्षिण भारताकडे वाहू लागले आहेत. याचा परिणाम म्हणून शनिवारपासून बुधवारपर्यंत मुंबईचे किमान तापमान १६ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३० नोंदविले जाईल. राज्याचे कमाल तापमान २६ तर किमान तापमान १२ ते १० अंश सेल्सिअस असेल. त्यानंतर पुन्हा तापमानात वाढ होईल.- अथ्रेय शेट्टी, हवामान अभ्यासक

महाराष्ट्रात भागपरत्वे कमाल तापमान २८ ते ३२ तर किमान तापमान १८ ते २० अंश आहे. येणाऱ्या थंड वाऱ्यांना सध्या अटकाव नाही. आकाश निरभ्र आहे. महाराष्ट्रात थंडीची शक्यता आहे. शनिवारपासून कमाल व किमान तापमानात महाराष्ट्रात हळूहळू २ ते ३ अंशांनी घसरण होऊन संपूर्ण महाराष्ट्रात थंडीला सुरूवात होईल.- माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ

English
हिंदी सारांश
Web Title : Winter Arrives: Maharashtra Braces for Temperature Drop, Grab Sweaters!

Web Summary : Maharashtra is set to experience a significant temperature drop, with Mumbai expecting 16°C. Experts predict colder days ahead due to Himalayan winds, advising residents to prepare for winter conditions starting this weekend.
टॅग्स :Winter Care Tipsथंडीत त्वचेची काळजीMumbaiमुंबई