शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

विधानपरिषदेचा भार दोन देसाईंवर; विरोधकांच्या टोमण्यानंतर वाजली सत्ताधाऱ्यांची बाके

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 06:04 IST

अर्थराज्यमंत्री शंभुराज देसाई सभागृहात येताच सत्ताधारी बाकांवरून घोषणाबाजी सुरू झाली. शिवरायांचा जयघोष केला.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विधानपरिषदेत अर्थराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प सादर केला. बंद गळ्याचा कोट घातलेले शंभुराज देसाई लगबगीने सभागृहात आले. आपल्या छोट्या बॅगेतून अर्थसंकल्पाची प्रत काढली. सभापतींच्या परवानगीनंतर तब्बल तासभर अर्थसंकल्पाचे वाचन केले. पण, सभागृहात उद्योगमंत्री सुभाष देसाई वगळता अन्य कोणी वरिष्ठ मंत्री नव्हते. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभेत असल्याने बहुतांश मंत्री तिथेच थांबले. त्यामुळे सत्ताधारी बाकांवर एक प्रकारची स्तब्धताच होती. विरोधकांनी अधुनमधून मारलेल्या टोमण्यानंतर सत्ताधारी आमदारांनी बाके वाजवत अर्थसंकल्पातील तरतुदींचे स्वागत करण्याची तसदी घेतली.

अर्थराज्यमंत्री शंभुराज देसाई सभागृहात येताच सत्ताधारी बाकांवरून घोषणाबाजी सुरू झाली. शिवरायांचा जयघोष केला. तोवर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह विरोधी सदस्यही सभागृहात आले. सत्ताधाऱ्यांच्या घोषणेत दम नसल्याचे सांगत विरोधी बाकांवर उच्चस्वरात घोषणा आली. त्याला उत्तर म्हणून अंबादास दानवे यांनी खास शिवसेना स्टाईलमध्ये घोषणा द्यायला सुरुवात केली. देसाई अर्थसंकल्पाचे सलग वाचन करत होते. त्यामुळे एकीकडे वाचन सुरू ठेवत पिण्याच्या पाण्याचा ग्लास शोधण्याचा त्यांनी काहीवेळा प्रयत्न केला. पण, पोडियम खालचा ग्लास त्यांच्या हाती लागत नव्हता. अखेर पाऊण तासाच्या सलग वाचनानंतर क्षणभर थांबत त्यांनी ग्लास हाती घेतला आणि पाण्याचा घोट घेतला. 

वाचन संपताच विरोधकांंकडून निषेधाच्या घोषणाअर्थसंकल्पातील एखाद्या तरतुदीनंतर सत्ताधारी सदस्य जोरात बाके वाजवत घोषणेचे स्वागत करतात. पण, आज सत्ताधारी बाकांवर पुरता निरुत्साह होता. विरोधक मात्र बसल्या जागेवरून नेमकी टोलेबाजी करत होते. विरोधकांच्या कुजबुजीचा आवाज वाढतच गेला. एसटीसंदर्भातील तरतूद अर्थराज्यमंत्री सांगत होते, तेव्हा तर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे काय, असा आवाजही विरोधी बाकांवरून आला. अर्थसंकल्पाचे वाचन संपताच विरोधकांनी निषेधाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. या घोषणाबाजीतच कामकाज संपले.

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट २०२२