सचिन काकडेसातारा : ऐतिहासिक सातारा नगरीतील कारागिरांनी आपल्या कौशल्यातून शिवकालीन इतिहासाला एक सोनेरी उजाळा दिला आहे. केवळ दागिने घडवण्याचे कसब न दाखवता, येथील कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांची अस्सल राजमुद्रा सोन्या-चांदीच्या अलंकारांवर कोरली आहे. ऐतिहासिक वारसा जपणारा हा राजेशाही साज महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांच्या पसंतीस उतरत आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!आजवर बाजारपेठेत शिवरायांच्या राजमुद्रेच्या अनेक प्रतिकृती (रिप्लिका) उपलब्ध होत्या. मात्र, त्यातील अक्षरांकन आणि रचनेत अनेकदा चुका आढळत असत. हीच बाब लक्षात घेऊन साताऱ्यातील जाणकार कारागिरांनी ऐतिहासिक पुराव्यांचा आणि अस्सल साधनांचा सखोल अभ्यास केला. थ्रीडी तंत्रज्ञानाचा कल्पक वापर करून, किंचितही त्रुटी न ठेवता प्रमाणबद्ध राजमुद्रा विविध दागिन्यांवर साकारली. साताऱ्यातील कारागिरांनी हे दागिने ऑनलाइन विक्रीस उपलब्ध केल्याने देशाच्या कोनाकोपऱ्यातील शिवभक्तांना ते एका क्लिकवर उपलब्ध होत आहेत.
महाराणी येसूबाईंच्या राजमुद्रेचा गौरवमहत्त्वाची बाब म्हणजे, शिवरायांच्या राजमुद्रेसोबतच स्वराज्याची धुरा समर्थपणे सांभाळणाऱ्या महाराणी येसूबाईंची राजमुद्रा प्रथमच दागिन्यांच्या रूपात समोर आली आहे. अंगठ्या, ब्रेसलेट आणि लॉकेट्सच्या माध्यमातून हा देदीप्यमान इतिहास केवळ संग्रही न राहता आता शिवप्रेमींच्या अंगाखांद्यावर झळकू लागला आहे.
इतिहासाची पाने पुन्हा उलगडलीआजची तरुणाई शिवरायांच्या विचारांनी प्रेरित आहे. आता याच प्रेमाला कारागिरांनी अस्सल इतिहासाची जोड दिली आहे. साताऱ्याच्या या कलेने केवळ दागिने घडवले नसून, धातूच्या रूपाने इतिहासाची पाने पुन्हा एकदा जिवंत केली आहेत.
महाराणी येसूबाई यांचे कार्य अलौकिक आहे. त्यांची राजमुद्रा हा एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज आहे. दागिन्यांवर उमटवलेली त्यांची राजमुद्रा ही त्यांचे पराक्रम अन् शौर्याचे प्रतीक असून, ती कायमच प्रेरणा देत राहील. - सुहास राजेशिर्के, संस्थापक, येसूबाई फाउंडेशन, सातारा
छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणारी अस्सल राजमुद्रा, दागिन्यांच्या माध्यमातून घराघरांत पोहचवताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. तमाम शिवप्रेमींकडून हे दागिने घडवून घेतले जात आहेत. - निशांत पंडित, कारागीर व व्यावसायिक
Web Summary : Satara artisans recreate Shivaji Maharaj and Yesubai's royal seals on jewelry. Flawless replicas, using 3D technology, are now available online. This royal heritage appeals to Maharashtra's Shivaji devotees, reviving historical pride.
Web Summary : सतारा के कारीगरों ने शिवाजी महाराज और येसूबाई की शाही मुहर को गहनों पर उकेरा। 3डी तकनीक का उपयोग करके त्रुटिहीन प्रतिकृतियां अब ऑनलाइन उपलब्ध हैं। यह शाही विरासत महाराष्ट्र के शिवाजी भक्तों को आकर्षित करती है, ऐतिहासिक गौरव को पुनर्जीवित करती है।