शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

थरावर थर...

By admin | Updated: August 19, 2014 00:54 IST

ढोलताशांचा गजर... डीजेचे बीट्स...त्यावर थिरकणारी तरुणाई...पाण्याचा होणारा वर्षाव... थरावर थर रचत दहीहंडीचे लक्ष्य गाठणाऱ्या गोविंदाचा थरार... आणि एकच गुंज गोविंदा आला रे आला...

गोविंदांचा गजर : दहीहंडीचा जल्लोषनागपूर : ढोलताशांचा गजर... डीजेचे बीट्स...त्यावर थिरकणारी तरुणाई...पाण्याचा होणारा वर्षाव... थरावर थर रचत दहीहंडीचे लक्ष्य गाठणाऱ्या गोविंदाचा थरार... आणि एकच गुंज गोविंदा आला रे आला... उपराजधानीत जन्माष्टमीचा उत्साह आज ओसंडून वाहत होता. या उत्साहात गोविंदांबरोबरच गोपिकाही रंगल्या होत्या. उच्च न्यायालयाने लावलेल्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने, आयोजकांनी दहीहंडी सोहळ्याचे भव्य आयोजन करून नागपूरकर गोविंदाच्या रंगात रंगले होते. शहरातील मोठ्या बक्षिसांची दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांनीही चांगलाच जोर लावला होता. इतवारा नवयुवक मंडळ विदर्भात सर्वात मोठ्या बक्षिसाच्या दहीहंडीचा मान इतवारा नवयुवक मंडळाचा आहे. ही दहीहंडी फोडण्यासाठी नागपूरसह मध्य प्रदेशातूनही गोविंदा पथक नागपुरात दाखल झाले होते. मंडळाने गोपिकांनाही दहीहंडी फोडण्याची संधी दिली. मात्र गोपिकांचे एकच पथक हंडी फोडण्यासाठी सज्ज झाल्याने, राधाकृष्ण महिला मंडळाने हंडी फोडून १,११,१११ रुपयांचे बक्षीस पटकाविले. मात्र गोविंदांच्या सहा पथकात हंडी फोडण्यासाठी चढाओढ लागली होती. रात्री ८ वाजेपर्यंत गोविंद थरावर थर रचत होते, पडत होते आणि पुन्हा जोमाने लक्ष्य गाठण्यासाठी संघर्ष करीत होते. उपस्थितांकडून होणारा गोविंदांचा गजर आणि पाण्याच्या वर्षावामुळे गोविंदा पथकात आणखी ऊर्मी येत होती. आयोजनस्थळी एकीकडे गोविंदांचा थरार होता, तर दुसरीकडे डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या तरुणाईच्या जल्लोषात आबालवृद्धही रंगले होते. शेवटी साडेआठच्या सुमारास गोल्डन स्पोर्टिंग क्लबने पाच थर रचून ३५ फूट उंच दहीहंडी फोडली आणि चार लाख पाच हजार ५५५ रुपयांचे बक्षीस पटकाविले. या कार्यक्रमाला खा. अविनाश पांडे, माजी मंत्री अनिस अहमद, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, पोलीस आयुक्त के. के. पाठक, अतुल कोटेचा, गिरीश व्यास, परिणय फुके, मधुभाई सोनी, राजेश छाबरानी आदी उपस्थित होते. दक्षिणमध्ये जल्लोष दक्षिण नागपूरमध्ये सर्वात मोठ्या दहीहंडीचे आयोजन भारतीय जनता पार्टी दक्षिण नागपूरतर्फे परशू ठाकूर यांनी केले होते. ३.५० लाख रुपयांच्या बक्षिसांची ही दहीहंडी फोडण्यासाठी तीन गोविंदा पथक सहभागी झाले होते. शारदा चौकात झालेल्या दहीहंडी सोहळ्याचा थरार अनुभवण्यासाठी लोकांची मोठ्या संख्येत गर्दी झाली होती. पाण्याचा वर्षाव, डीजेचे बिटस् आणि गोविंदांचा संघर्ष रात्री ९ वाजेपर्यंत सुरू होता. ४१ फुटावर लावण्यात आलेली दहीहंडी फोडण्यास गोविंदा पथकांना अपयश आल्याने आयोजकांनी ती २५ फुटांवर आणली. त्यामुळे बक्षिसांचीही रक्कम कमी करण्यात आली. जय महाकाली मंडळ गोविंदा पथकाने पहिल्याच प्रयत्नात दहीहंडी फोडून १,०१,००० रुपयांचे बक्षीस पटकाविले. या सोहळ्याला आ. कृष्णा खोपडे, महापौर अनिल सोले, सत्तापक्ष नेते प्रवीण दटके, प्रमोद मानमोडे, रवींद्र ऊर्फ छोटू भोयर, किशोर कन्हेरे, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मुंडे उपस्थित होते. दहीहंडीपूर्वी श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. यात सहभागी बालकांना आकर्षक बक्षिसेही देण्यात आली. लोकांची गर्दी लक्षात घेता आयोजनस्थळी भव्य स्क ीन लावून दहीहंडी उत्सवाचा लाईव्ह दाखविण्यात आला. खामल्यातही रंगला उत्सवखामलावाली मातामंदिर, सिंधी कॉलनी येथे सिंध माता मंडळाच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दहीहंडीचे पूजन नगरसेवक प्रकाश तोतवानी, दत्तात्रय माटे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या गोविंदांच्या पथकांनी दहीहंडी फोडण्यासाठी चांगलाच संघर्ष केला. शेवटी न्यू सोनझरी नगरातील जय माँ काली मंडळाने दहीहंडी फोडून स्पर्धेत विजयश्री मिळविली. यावेळी नारायण भोजवानी, नंदलाल चेतवानी, नरेश डेंबवानी, परमानंद शंभुवानी, राजन रामचंदानी, सेवकराम तोतवानी, बाबला करमचंदानी आदी उपस्थित होते. हिरणवार समाजातर्फे शोभायात्रायदुवंशी अहिर गवळी गोपाल हिरणवार समाजातर्फे श्रीकृष्ण जन्मोत्सानिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शीतला माता मंदिर, गवळीपुरा धरमपेठ येथे श्रीकृष्णाची पूजा-अर्चना करून महाआरती झाली. शोभायात्रेत श्रीकृष्णाच्या विविध लीलांवर चित्ररथ साकारले होते. शहरातील चौकाचौकात शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी प्रसादाचे वितरण करण्यात आले. शोभायात्रेच्या आयोजनात कन्हय्यालाल चंदेले, दीपक यादव, सुनील हिरणवार, राजू पटेल, महेश बनिया, रोहित चौधरी, सुधाकर काळे, यादवराव मिसाळ, रघुनाथ निगोटे आदी सहभागी झाले होते. जगत पब्लिक स्कूलवाठोडा येथील जगत पब्लिक स्कूल येथे जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेतील प्राथमिक व माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी कृष्णाच्या लीलांवर नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांनी गोविंदा आला रे आलाचा गजर करीत दहीहंडी फोडली. यावेळी मुख्याध्यापिका शुभदा जोशी, संस्थापक शरद गांधी, भंवरलाल सारडा, सुधा गांधी, ममता बिरहा, छाया पोटभरे आदी उपस्थित होते. कलगीधर सत्संग मंडळजरीपटका येथील कलगीधर सत्संग मंडळातर्फे श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त गुरुबानी कीर्तन- प्रवचनकार माधवदास ममतानी यांचे श्रीकृष्ण जीवन चरित्रावर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी आपल्या प्रवचनात श्रीकृष्णाच्या जन्मापासून कंसवधाचे वर्णन केले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. प्रवचनानंतर गोपालकाला वाटप करण्यात आला. प्रबोधन कॉन्व्हेंटअयाचित मंदिर येथील प्रबोधन कॉन्व्हेंटमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मीनाक्षी पाध्ये यांच्या हस्ते दहीहंडीचे पूजन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी गोविंदा पथक तयार करून दहीहंडी फोडली. यावेळी कृष्णलीलेवर नृत्यनाटिका सादर केली. राधाकृष्णाच्या वेशभूषेत विद्यार्थी उपस्थित होते. मॅक्स ग्रुप, गुडलक सोसायटीश्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त हिंगणा मार्गावरील गुडलक सोसायटी येथे मॅक्स ग्रुपच्यावतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. ढोलताशांच्या गजरात युवकांनी जल्लोष केला. गोपालकृष्णाच्या जयजयकाराने परिसर दुमदुमुन गेला होता. ग्रुपचे अध्यक्ष विनोद खोब्रागडे यांच्या नेतृत्वामध्ये सनी पळसपगार, स्वप्नील नेमाडे, पराग पडोळे, अक्षय डांगे, सौरभ लांबाडे, अक्षय पळसपगार, शैलेश बावने, सागर शेळके, आलोक मंडलेकर, अंकित सावरकर, पलाश सावरकर, संदीप आवळे, बॉबी रेगानी, आकाश गावंडे, रोहित गवाळे, सुनील वाघमारे, राहुल लोणारे, अनिरुद्ध मांडे, रिपुरंजन सिंह, अंकित वानखेडे, सुमित आवळे, पवन देवारे आदी युवक दहीहंडीमध्ये सहभागी झाले होते. दहीहंडी फुटताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर गोपालकाला लुटण्यासाठी परिसरातील बच्चे कंपनी मोठ्या संख्येने उपस्थित होती. दहीहंडीनंतर गोपालकाल्याचे वितरण करण्यात आले. मागील तीन वर्षांपासून सोसायटीमध्ये दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला जातो. परिसरातील नागरिक उत्साहाने यामध्ये सहभागी झाले होते. योगेश्वर श्रीकृष्ण मंदिरछत्रपतीनगर येथील योगेश्वर श्रीकृष्ण मंदिरात कृष्ण जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सायंकाळीपासून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. रात्री भजनांचे आयोजन करण्यात आले होते. रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्म साजरा करण्यात आला. सोमवारी सकाळी ९ वाजतापासून आरती, पूजा-अवसराने सोहळ्याला सुरुवात झाली. दुपारी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. तपस्विनी प्रेमाताई बांधकर व तपस्विनी योगिताताई बांधकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात भक्तगण कार्यक्रमात सहभागी झाले होते. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना गोपालकाल्याचे वितरण करण्यात आले. (प्रतिनिधी)