शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मधुर, रसाळ हापूस आला ठाणेकरांच्या आवाक्यात!

By admin | Updated: April 26, 2016 03:43 IST

हंगाम सुरू होताच मार्चमध्ये दरांच्या बाबतीतही आपले राजेपण जपणाऱ्या आंब्याने आता मात्र आवक वाढू लागल्यावर हळूहळू का होईना पण सामान्यांच्या खिशाला परवडेल असा दराचा पल्ला गाठला आहे.

ठाणे : हंगाम सुरू होताच मार्चमध्ये दरांच्या बाबतीतही आपले राजेपण जपणाऱ्या आंब्याने आता मात्र आवक वाढू लागल्यावर हळूहळू का होईना पण सामान्यांच्या खिशाला परवडेल असा दराचा पल्ला गाठला आहे. आंब्यांचा आकार, दर्जा यानुसार सध्या हापूसचे दरही ३०० ते ४०० रूपयांपासून सुरू होत असल्याने त्यांचा घमघमाट आता मध्यमवर्गीयांच्याही आवाक्यात आला आहे. पाडव्याच्या अगोदर माफक आवक असलेल्या आंब्याने आपला आब कायम ठेवत डझनाला १६०० रूपयांपर्यंतचा भाव मिळवला होता. एप्रिलच्या अखेरीपासून आवक वाढत गेली, तसतसा दरही हळूहळू उतरत गेला आणि देवगड-रत्नागिराच्या हापूसपासून वेगवेगळ््या ठिकाणचा आंबा आपला आकार, दर्जा यानुसार आवाक्यात आला. मार्चमध्ये असलेले आंब्याचे दर पाहता सर्वसामान्य ठाणेकर खरेदीकडे फिरकतच नव्हते. मात्र, आता दर हळूहळू कमी होत असल्याने आंब्याच्या खरेदीकडे खवय्यांची पावले वळू लागली आहेत. ठाण्याच्या बाजारपेठेत ३०० रूपयांपासून पार हजार रूपयांपर्यंत आंबे मिळत आहेत. देवगड, रत्नागिरीच्या आंब्याचे दर साधारण सारखेच असून सर्वात लहान आंब्याचे दर ३०० च्या घरात आहेत. काही विक्रेते रायवळ आंब्याचीही विक्री करताना दिसत आहेत. (प्रतिनिधी)