शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

जलयुक्त शिवारात ठाणे आघाडीवर

By admin | Updated: September 30, 2016 02:36 IST

जलयुक्त शिवार योजना कोकणातील २०३ गावांमध्ये सुरू आहे. यातील १५० गावांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ५३ गावांची कामे डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण होणार आहेत. ठाणे जिल्ह्यात

ठाणे : जलयुक्त शिवार योजना कोकणातील २०३ गावांमध्ये सुरू आहे. यातील १५० गावांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ५३ गावांची कामे डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण होणार आहेत. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक एक हजार ८८५ वनराई बंधारे झाले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोकण विभागातील ठाणे, पालघर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी योजनांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ठाण्यात आढावा घेतला. विभागात वनराई बंधाऱ्यांचे काम उत्तम झाले आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक एक हजार ८८५ बंधारे झाले आहेत. या बंधाऱ्यांमुळे पाच जिल्ह्यांमधील १७ हजार ४४२ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.कोकणातील ५० हजार हेक्टर पडीक जमिनीवर नरेगाची कामे घेतली जाणार आहेत. त्यासाठी एक हजार कोटी रुपये खर्च करण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. आंबालागवडीसाठी पाच बाय पाच ही नवीन अट लागू केली आहे. यानुसार, आंबापीक लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख ८१ हजार रुपयांचे अनुदान नरेगाद्वारे दिले जाणार आहे. मागेल त्या शेतकऱ्यास शेततळ्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या ‘ठाणे सहज’ या मोबाइल अ‍ॅपचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा वगळताठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता, सिंधुदुर्गचे दीपक केसरकर, रत्नागिरीचे रवींद्र वायकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.मार्चअखेरपर्यंत कोकण हगणदारीमुक्त - स्वच्छ भारत मिशनमध्ये महाराष्ट्राचा दहावा क्रमांक आला आहे. कोकणातील ६४ टक्के ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झाल्या आहेत. उर्वरित ३३ टक्के ग्रा.पं. २०१७ पर्यंत हगणदारीमुक्त करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. राज्यात ६२ टक्के कुटुंबीयांकडे वैयक्तिक शौचालये आहेत. यात कोकण विभागात सरासरी ८३ टक्के कुटुंबीयांकडे वैयक्तिक शौचालये आहेत, असे त्यांनी सांगितलेसेवा हमी कायदा - यामध्ये १३ सेवा देण्याची कामे दिली आहे. यासाठी पाच जिल्ह्यांमधून चार लाख ४४ हजार ८५० अर्ज दाखल झाले. त्यातील चार लाख ४४ हजार ८०५ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. उर्वरित ८२ अर्जदार प्रथम सुनावणीस गेले. त्यावर, निर्णय झाला असून फक्त द्वितीय सुनावणीत चार अर्ज शिल्लक असल्याचे नमूद केले. (प्रतिनिधी)सिंचन विहिरी कोकणात ६ हजार १२३ सिंचन विहिरींची कामे हाती घेतली आहेत. त्यातील ३ हजार ३३७ विहिरी पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित २ हजार २९० डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहेत.कृषिपंपांची जोडणीविभागात ५ हजार ८४५ कृषिपंपांची कामे हाती घेतली आहेत. यातील १ हजार ९१० पंपांना आतापर्यंत वीजजोडण्या दिल्या आहेत. उर्वरित ३ हजार ९३५ जोडण्या शिल्लक आहेत.आवास योजनाविभागात प्रधानमंत्री आवास योजनेच्या १३ हजार ९९७ घरांपैकी १२ हजार ७६० घरांसाठी पहिल्या हप्त्याचे अनुदान देण्यात आले आहे. दुसरा हप्ता लवकरच ४हजार ५३८ घरांसाठी देण्याचे नियोजन केले आहे. डिसेंबरपर्यंत ९० टक्के, तर मार्चपर्यत उर्वरित १० टक्के घरांचे काम पूर्ण होणार आहे. रमाई आवास योजनेद्वारे ३ हजार ७३५ घरांची कामे हाती घेतली आहेत.