शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

ठाणे: शिवसाई पथकाने फोडली मनसेची दहीहंडी, 9 थर लावून मिळवलं 11 लाखांचं बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2017 16:30 IST

मनसे ठाणे शहर आयोजित नौपाडा येथील दहीहंडी फोडण्याचा मान बोरीवलीच्या शिवसाई मंडळाने पटकावला आहे. यासह त्यांनी 11 लाखांचं बक्षीस देखील मिळवलं.

ठाणे, दि. 15 - सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या कचाट्यातून सुटलेला दहीहंडी उत्सव, यंदा जोश-जल्लोषात साजरा करण्यासाठी गोविंदा पथके सज्ज आहेत. मनसे ठाणे शहर आयोजित नौपाडा येथील दहीहंडी फोडण्याचा मान बोरीवलीच्या शिवसाई मंडळाने पटकावला आहे. यासह त्यांनी 11 लाखांचं बक्षीस देखील मिळवलं. नौपाड्यातील या दहीहंडीला शिवसाई पथकाने 9 थरांची यशस्वी सलामी दिली, त्यानंतर हंडीची उंची कमी करून त्यांनी हंडी फोडली. जय जवान पथकानं यंदाही 9 थर आणि जमल्यास 10वा थरही लावण्याचा निश्चय केला होता. मात्र ठाण्यातील मनसेच्या दहीहंडीत जय जवान मंडळाचा नऊ थर रचण्याचा पहिला प्रयत्न फसला.

मनसे ठाणे शहर आयोजित या दहिहंडीची ढोल ताशा पथकाने सुरुवात झाली. पार्ले स्पोर्ट्स महिला गोविंदा पथकला थर लावण्याचा पहिला मान मिळाला मिळाला. आयोजकांकडून हंडी फोडणाऱ्या गोविंदांसाठी सेफ्टी गिअर, जमिनीवर गाद्या, हारनेस्ट आणि अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली होती.

यंदा स्वातंत्र्य दिन आणि दहीहंडी उत्सव एकाच दिवशी आल्याने, चाकरमानी मुंबईकरांना थरांचे स्वातंत्र्य अनुभवायला मिळणार आहे. मागील काही वर्षांत न्यायालयीन निर्बंधांमुळे संभ्रमावस्थेत असलेल्या उत्सवावर भीतीचे सावट दिसून आले. मात्र, यंदा गोविंदा पथके सर्व निर्बंध झुगारून ‘करून दाखविणारच’ या निर्धाराने मैदानात उतरताना दिसणार आहेत.मंगळवारी सकाळी ध्वजारोहणानंतर दहीहंडी उत्सवावाठी गोविंदा पथके कूच करणार आहेत. यानंतर, सकाळपासून काळाचौकी, लालबाग, परळ, दादर, वरळी, ग्रँटरोड, ताडदेव या शहरांतील विभागांमध्ये फिरून, दुपारनंतर पूर्व आणि पश्चिम उपनगरात गोविंदा पथके हंड्या फोडण्यासाठी जातील. त्यातही सायंकाळनंतर प्रसिद्ध गोविंदा पथके ठाण्यातील बड्या हंड्या फोडण्यासाठी सहभागी होतील. उच्च न्यायालयाने बालगोविंदाचे वय कमी करून १८ वरून १४ केले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशांचे पालन गोविंदा पथके करणार, याकडे पोीिलसांचे बारकाईने लक्ष राहील.उत्सवादरम्यान सूचनांचे पालन करण्याचे आवाहन दहीहंडी समन्वय समितीने व्हिडीओच्या माध्यमातून केले आहे. तर याचिकाकर्त्या स्वाती पाटील यांनीही थरांची उंची गाठताना कुटुंबाचा विचार करा, असे आवाहन केले आहे.पोलिसांचे सुरक्षा कवच : मुंबई पोलीस दलातील ३५ हजार अधिकारी आणि जवान, शहरातील अतिसंवेदनशील ठिकाणी तैनात राहतील. केंद्रीय व राज्य राखीव बलाच्या १५ तुकड्या, एटीएस, शीघ्रकृती दल तैनात असून अतिरेकी कारवायांच्या शक्यतेतून गुप्तचर तपास यंत्रणाकार्यरत असतील, असे कायदा व सुव्यवस्थाचे प्रमुख सहायुक्त देवेन भारती यांनी सांगितले. ड्रोनसह ५ हजार सीसीटीव्हींचा वॉच असेल.>आयोजकांची माघारन्यायालयाच्या कचाट्यातून बाहेर पडूनही दहीहंडी उत्सवाच्या बड्या आयोजकांनी माघार घेतल्याने यंदाच्या उत्सवात आयोजकांची कमतरता दिसून येणार आहे. त्यामुळे बरेच गोविंदा पथक उपनगरांकडे कूच करताना दिसून येतील. नोटाबंदी आणि वस्तू सेवा करामुळे दहीहंडी आयोजनाचा आलेख ६०-७० टक्क्यांनी खाली उतरला आहे. याशिवाय, ब-याच आयोजकांनी कारवाईच्या धास्तीनेही आयोजनातून काढता पाय घेतलाआहे.दुसºया बाजूला आयोजनाच्या शर्यतीत असणाºया आयोजकांनी बक्षिसांच्या रकमांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. काही ठिकाणी सहा थरांना ५ हजार रुपयांचे पारितोषिक आहे, तर काही ठिकाणी अवघ्या दीड हजारांचे पारितोषिक आहे. तरीही यंदा गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याने काही जणांनी पारंपरिकता जपून तर काहींनी उंची गाठून उत्सव साजरा करणारच असे म्हटले आहे.>यंदा १० थर : माझगाव ताडवाडी गोविंदा पथक आणि जय जवान गोविंदा पथकाने नऊ थरांचा विक्रम केला आहे. यंदा याच्याही एक पाऊल पुढे जात दहा थर लागणार आहेत. उपनगराचा राजा मानल्या जाणा-या जय जवान गोविंदा पथकाने या विक्रमासाठी कसून तयारी केली आहे. याशिवाय दादरमधील कलाकारांचा दहीहंडी मुंबईकरांसाठी औत्सुक्याचा विषय आहे.

(फोटो-विशाल हळदे)