शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे: ताटातूट झालेल्या आजींना रेल्वेकडून मदत, घरी परण्यासाठी काढून दिले तिकीट; खर्चासाठीही दिले पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 02:44 IST

ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात तारीख असल्याने न्यायबंदी मुलाला भेटण्यासाठी आलेल्या अक्कलकोट येथील ७० वर्षीय आजीबाई आणि तिच्या सुनेची मुलाच्या भेटीनंतर घरी परताना ठाण्यात ताटातूट झाली.

पंकज रोडेकरठाणे : ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात तारीख असल्याने न्यायबंदी मुलाला भेटण्यासाठी आलेल्या अक्कलकोट येथील ७० वर्षीय आजीबाई आणि तिच्या सुनेची मुलाच्या भेटीनंतर घरी परताना ठाण्यात ताटातूट झाली. त्यानंतर ती आजीबाई कसेबसे ठाणे रेल्वे स्थानकात आली. याचदरम्यान, रेल्वे प्रशासनाने तिच्या सुनेचा शोध घेतला. पण, ती शोधून न सापडल्याने अखेर तिला मदत म्हणून रेल्वे तिकीट आणि खर्चाला पैसे देऊन एक्सप्रेसमध्ये बसवून घरी धाडले.लक्ष्मीबाई (नाव बदलेले आहे) आणि त्यांची सून या दोघी तळोजा जेलमध्ये न्यायबंदी असलेल्या मुलाची शुक्रवारी ठाणे न्यायालयात हजर करण्याची तारीख असल्याने त्याला भेटण्यासाठी सकाळी ठाण्यात आल्या. दुपारी भेट झाल्यानंतर दोघीही पायी ठाणे रेल्वे स्थानकाकडे घरी जाण्यासाठी परताना त्या ठाणे बाजारपेठेत झालेल्या गर्दीत रस्त्याच्या वेगवेगळ्या बाजूला गेल्या. याचदरम्यान, गर्दीतून आजीबाई सुनेच्या दिशेने जात असताना, अचानक दोन-तीन बस आणि एका मागून एक आल्याने काही वाहनांमुळे त्यांची ताटातूट झाली. गर्दी कमी झाल्यावर आजीबार्इंनी सुनेचा शोध घेतला. मात्र, ती न सापडल्याने मोठ्या धीराने त्यांनी लोकांना विचारत कसेबसे ठाणे रेल्वे स्थानक गाठले. तोपर्यंत सांयकाळचे ५.३० वाजले होते. सून रेल्वे स्थानकात असेल म्हणून त्यांनी ठाणे रेल्वे स्थानक प्रबंधक कार्यालयामार्फत शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीही दाद देत नसल्याने केविलवाण्या अवस्थेत असलेल्या आजीबार्इंना रेल्वे प्रशासनाने धीर देऊन विचारपूस केली. त्यावेळी आजीबाई अक्कलकोट येथे राहणाºया असल्याचे समोर आले.आजीबार्इंच्या कपड्यांवरून त्या गरीब घरातील असल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यांच्याकडील एका पिशवीत पाण्याची बाटली आणि अवघी दहा रुपयांची नोट होती. याचदरम्यान, अक्कलकोटला जाण्यासाठी रात्री १०.३५ ची कुर्ला- कोईम्बतूर एक्सप्रेस असल्याने तब्बल पाच तासांचा मुक्काम आजीबार्इंचा प्रबंधक कार्यालयात होता. नाश्ता आणि रात्रीचे जेवण करून त्या एक्सप्रेसने आपल्या घराकडे रवाना झाल्या.दरम्यान, रेल्वे प्रशासनाने तातडीने या वृद्ध महिलेच्या तक्रारीची दखल घेऊन तिला सर्वतोपरी मदत करून आपल्या नातलगांपर्यंत जाण्याकरता मदत केल्याबद्दल प्रवासी संघटना आणि ज्येष्ठ नागरिकांकरता काम करणारे कार्यकर्ते यांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे