शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात बालमृत्यूचे प्रमाण वाढले, दोन महिन्यात दहा कुपोषित बालकं दगावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 22:34 IST

पावसाने कहर केलेल्या ठाणे जिल्ह्यात मागील दोन महिन्यांत 10 कुपोषित बालकांसह दोन अर्भकांचा मृत्यू झाला. यापैकी सात बालकांना ऑगस्ट महिन्यात मृत्यूने गाठले. ठाणे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा मात्र अद्यापही झोपेतच आहे. एप्रिलपासून ऑगस्टपर्यंत 27 बालकांचा मृत्यू झाला आहे.

सुरेश लोखंडेठाणे, दि. 10 - पावसाने कहर केलेल्या ठाणे जिल्ह्यात मागील दोन महिन्यांत 10 कुपोषित बालकांसह दोन अर्भकांचा मृत्यू झाला. यापैकी सात बालकांना ऑगस्ट महिन्यात मृत्यूने गाठले. ठाणे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा मात्र अद्यापही झोपेतच आहे.  एप्रिलपासून ऑगस्टपर्यंत 27 बालकांचा मृत्यू झाला आहे. जुलै महिन्यात पाच आणि सात बालके सणासुदीच्या ऑगस्ट महिन्यात दगावली. यात दोन अर्भक आहेत. या मृत्यूंमुळे प्रशासनासह जिल्हा परिषदेला सामाजिक संघटना धारेवर धरण्याच्या तयारीत आहेत.मृत्युमुखी पडलेल्या बालकांमध्ये शहापूर तालुक्यातील तईचीवाडी-लेनाड येथील शेतमजूर रिद्धी वामन पारधी या मातेच्या दीड वर्षाच्या बालिकेचा समावेश आहे. ठिले येथील बेबी निचिते यांची सव्वातीन महिन्यांची बालिका, अंबर्जे या गावातील अंकुश व विनोद या दोन भावांची मुले एका दिवसाआड दगावली. सुमारे दोन महिने कालावधीच्या या मुलांचे अनुक्रमे दोन किलो 500 ग्रॅम व एक किलो 500 ग्रॅम वजन असल्याचे नोंदवण्यात आले. कसा-याजवळील वाशहा खुर्द येथील उषा हौशा मुकणो या मातेची दीड वर्षाची बालिका दोन किलो 700 ग्रॅम वजनाची होती. भागदळ-दहिवली येथील ओमकार वाघ या मजुराचे 19 दिवसांचे बालक दगावले आहे. मुरबाड तालुक्यातील शिरोशीजवळील आळवे येथील बेबी बाबजी हिलम या मातेच्या प्रसूतीदरम्यान बालिकेचा मृत्यू झाला आहे.  जुलैत शहापूर तालुक्यातील मढ गावातील दोन बालकांचा दोन दिवसाआड मृत्यू झाला. कासगावमधील तीन वर्षाची बालिका सेप्टीसेमियाने दगावली. याप्रमाणोच जून महिन्यात सहा मुले ठिकठिकाणची दगावली आहेत. सात बालके मे महिन्यात दगावली असून यात तीन बालिका व चार मुलांचा समावेश आहे. याशिवाय एप्रिल महिन्यात चार वर्षाची एक आणि दीड महिन्याची एक अशा दोन बालिकांचा मृत्यू झाला आहे.