शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे पोलिसांनी केला पोर्टेबल लायटिंग टॉवरचा वापर, राज्यातील पहिला अभिनव उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 17:57 IST

मुंब्य्रासारख्या भागातील रेती बंदर घाट परिसरात देवी विसर्जन करणा-या भाविकांसाठी तसेच मोहरमच्या मिरवणुकीच्या वेळी गर्द अंधारामुळे कोणताही गैर प्रकार होऊ नये यासाठी राज्यात प्रथमच ठाणे पोलिसांनी ‘पोर्टेबल इनफ्लेटेबल लायटिंग टॉवर’चा वापर केला.

ठाणे: मुंब्य्रासारख्या भागातील रेती बंदर घाट परिसरात देवी विसर्जन करणा-या भाविकांसाठी तसेच मोहरमच्या मिरवणुकीच्या वेळी गर्द अंधारामुळे कोणताही गैर प्रकार होऊ नये यासाठी राज्यात प्रथमच ठाणे पोलिसांनी ‘पोर्टेबल इनफ्लेटेबल लायटिंग टॉवर’चा वापर केला. यामुळे मिरवणुकीतील बंदोबस्ताबरोबरच काळ्याकुट्ट अंधारात भाविकांना लख्ख प्रकाशाची सुविधा देण्याचा अनोखा उपक्रम पोलिसांनी राबविल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली.दस-याच्या दिवशी ३० सप्टेंबर रोजी ठाण्यात सार्वजनिक ११७ देर्वीच्या मूर्ती, आठ प्रतिमा, दोन घट तर खासगी १९४ मूर्ती, १२ प्रतिमा आणि ५२७ घट अशा ३११ मूर्ती, २० प्रतिमा आणि ५२९ घटांचे शहरातील वेगवेगळ्या तलाव आणि खाडी परिसरात विसर्जन करण्यात आले. १ आॅक्टोंबर रोजी मुंब्रा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मोहरम निमित्ताने २७ सार्वजनिक पंजे आणि सहा ताबूत तसेच २६० पंजे, १२ प्रतिमा आणि नऊ ताबूत असे २८७ पंजे, १२ ताजिया, १५ ताबूत अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात मिरवणुका काढल्या होत्या.कळवा रेतीबंदर घाट परिसरात देवी विसर्जन मिरवणुका येत असताना तसेच मोहरम निमित्ताने काढलेल्या मिरवणुका रेतीबंदर मुंब्रा येथे विसर्जनासाठी येत असताना अपु-या प्रकाश व्यवस्थेमुळे मिरवणुकीतील सामान्य नागरिक तसेच बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनाही समोरील दृश्य दिसणे अवघड जात होते. त्यामुळेच अशा मिरवणुकांवर नियंत्रण ठेवणेही पोलिसांना आव्हानात्मक होते. यंदा हीच समस्या पुन्हा उद्भवू नये, यासाठी या मिरवणुकांच्या दरम्यान पोर्टेबल इनफ्लेटेबल लायटिंग टॉवरचा विशेष वापर मुंब्रा आणि कळवा पोलिसांनी केला.रात्रीच्या वेळी प्रखर प्रकाशासाठी एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी सहज नेता येईल, अशा आधुनिक तंत्रज्ञानाच्या या टॉवरचा उपयोग करण्यासाठी पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सहपोलीस आयुक्त मधुकर पांडणेय, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या मिरवणुकांच्या वेळी कळवा आणि मुंब्रा भागात उत्कृष्टरीत्या वापर करण्यात आला. त्यामुळे मोहरमच्या मिरवणूकाही कोणत्याही अडथळयाविना पार पडल्याची माहिती स्वामी यांनी दिली. यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनाही या अनोख्या सुविधेचा चांगल्या प्रकारे उपयोग झाल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचेही त्यांनी सांगितले.कुठे होतो लायटिंग टॉवरचा उपयोग...ठाणे पोलिसांनी प्रथमच रात्रीच्या बंदोबस्तासाठी उपयोगात आणलेल्या या लायटिंग टॉवरचा उपयोग खाण उद्योग, चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान, आधुनिक शेती व्यवसायासाठी, इमारत बांधकाम व्यावसायाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये अत्यंत महत्वाचे काम पूर्ण करण्यासाठी रात्रीच्या वेळी प्रखर प्रकाशासाठी करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील अगदी अंधा-या भागातून जाणा-या देवी तसेच मोहरमच्या मिरवणुकांसाठी या अत्याधुनिक लायटिंग टॉवरचा वापर करण्यात आला.