शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे, पालघर जि.प. निवडणूक २८ जानेवारीला

By admin | Updated: January 6, 2015 02:50 IST

ठाणे आणि नवनिर्मित पालघर जिल्हा परिषदेची तसेच त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या १३ पंचायत समित्यांची निवडणूक २८ जानेवारीला होणार आहे.

मुंबई : ठाणे आणि नवनिर्मित पालघर जिल्हा परिषदेची तसेच त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या १३ पंचायत समित्यांची निवडणूक २८ जानेवारीला होणार आहे. अन्य जिल्ह्णांमधील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या रिक्तपदांची निवडणूकही त्याच दिवशी होईल, असे राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी जाहीर केले. याचा निकाल ३० जानेवारीला जाहीर करण्यात येतील.८ ते १३ जानेवारी दरम्यान (सुटीचा दिवस वगळून) उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येतील. आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी उमेदवारी अर्जासोबत जात प्रमाणपत्राची प्रत व जात प्रमाणपत्राच्या वैधता प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे. छाननीच्या वेळी मूळ जात प्रमाणपत्र व जातप्रमाणपत्राचे वैधता प्रमाणपत्र तपासणीकरीता सादर करणे आवश्यक आहे, असे राज्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. निवडणुकीसाठीची आचारसंहिता संबंधित क्षेत्रात सोमवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून लागू झाली असून ती ३० जानेवारीपर्यंत राहील. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर, कल्याण, अंबरनाथ आणि मुरबाड तर पालघर जिह्यातील वसई, तलासरी, डहाणू, विक्र मगड, जव्हार, मोखाडा, वाडा आणि पालघर या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका होणार असून रत्नागिरी, रायगड, पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, गडचिरोली या जिल्ह्णांमध्ये जिल्हा परिषदेच्या काही गटांची पोटनिवडणूक होणार आहे. (विशेष प्रतिनिधी)