शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
3
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
4
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
5
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
6
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
7
"तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
8
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
9
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
10
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
11
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
12
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
13
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
14
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
15
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
16
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
17
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
18
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
19
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
20
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’

ठाण्यातील मोर्चा : १०० चौकसभांतून वातावरण निर्मिती, सोशल मीडियावरही भर

By admin | Updated: October 5, 2016 02:41 IST

राज्यात विविध ठिकाणी निघालेल्या मराठ्यांच्या मूक मोर्चाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर सर्वांचेच लक्ष लागलेला ठाण्यातील येत्या १६ आॅक्टोबरचा मोर्चा यशस्वी करण्याकरिता

ठाणे : राज्यात विविध ठिकाणी निघालेल्या मराठ्यांच्या मूक मोर्चाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर सर्वांचेच लक्ष लागलेला ठाण्यातील येत्या १६ आॅक्टोबरचा मोर्चा यशस्वी करण्याकरिता कार्यकर्त्यांची जय्यत तयारी सुरु आहे. जिल्ह्यातील ज्या ज्या भागात मराठ्यांची संख्या अधिक आहे, तेथे १३ तारेखपर्यंत १०० सभा घेण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. ठाण्यात निघणाऱ्या मोर्चात सुमारे १० लाखांचा जनसमुदाय उसळेल, असा दावा करण्यात आला आहे.मराठ्यांना आरक्षण मिळावे, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल व्हावे या मागणीसह इतर काही मागण्या मान्य करण्यासाठी मागील महिन्यापासून राज्यभर मराठ्यांनी एल्गार पुकारला आहे. परंतु राज्यभर निघणारे हे मोर्चे अतिशय शिस्तबध्द आहेत. ठाण्यातही तसाच शिस्तबद्ध व रेकॉर्डब्रेक मोर्चा काढण्याचा निर्धार मराठा मोर्चाचे ठाण्याचे आयोजक रमेश आंब्रे, कैलाश म्हापदी, दत्ता चव्हाण आणि अविनाश पवार यांनी केला आहे. २३ सप्टेंबर पासून या मोर्चाची तयारी सुरु झाली आहे. जिल्ह्यांचे चार भागात विभाजन करण्यात आले असून, त्यातून मोखाडा, डहाणु, जव्हार, तलासरी हे भाग वगळण्यात आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ६४ सभा झाल्या असून या सर्वच सभांना यश आल्याचे आयोजकांनी सांगितले. पहिल्या गटात विक्रमगड, वाडा, वसई, नालासोपारा, बदलापुर, अंबरनाथ, उल्हासनगर असा गट तयार करण्यात आला आहे. शहापूर, मुरबाड असा दुसरा स्वंतत्र गट तयार करण्यात आला आहे. भिंवडी हा तिसरा तर नवी मुंबई आणि ठाणे असा चवथा गट तयार करण्यात आला आहे. कुणबी समाजाने देखील या मोर्चाला पाठिंबा दिल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. ठाणे मुंबईत वास्तव्यास असलेले युपी, बिहारमधील नागरीक हे ठाकूर असल्याने त्यांंनी देखील या मोर्चात उतरण्याचा निर्धार केला आहे. कल्याणमध्ये मराठ्यांचे मोठे नेटर्वक असल्याने या भागातून अधिक नागरिक मोर्चात सहभागी होणार आहेत. चरईत मोर्चाची वॉर रुममोर्चा यशस्वी करण्यासाठी ठाण्यातील चरई भागात वॉर रुम तयार करण्यात आली असून तेथून सोशल मीडियावरील मोर्चाचा प्रचार केला जात आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर मोर्चाच्या प्रचाराकरिता तीन ग्रुप तयार करण्यात आले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील नामवंत व्यावसायिक, डॉक्टर, वकील, पत्रकार आदींचा समावेश केला आहे. येत्या रविवारी ९ तारखेला कल्याणमधील आर्चाय अत्रे रंगमंदिरात सभा होणार असून त्याच दिवशी दिव्यात रॅली निघणार आहे. तसेच शहापूर, मुरबाडमध्येही याच दिवशी सभा घेण्यात येणार आहे. याशिवाय किन्हवली, डोळखांब येथे बुधवारी ५ तारखेला सभा होणार आहेत. त्यानुसार येत्या १३ आॅक्टोबरपर्यंत तब्बल १०० सभा घेण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. मुस्लीमांचा पाठिंबा : मराठा समाजाच्या मोर्चाला आता मुस्लिम समाजाचेही पाठबळ मिळणार असून मुंब्य्रातील मुस्लिम संघटनांनी या मोर्चाला आपला जाहीर पाठिंबा दर्शविला असल्याचा दावा आयोजक कैलाश म्हापदी यांनी केला. पुरोगामी मुस्लिम संघटनांनी देखील या मोर्चाला समर्थन दिले आहे. आठ हजार वाहनांचे पार्कींग : मुंलुड चेकनाका, तीनहात नाका आणि कॅडबरी जंक्शनवरील सर्व्हीस रोडवर सुमारे सात ते आठ हजार वाहने पार्क होऊ शकतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. या मोर्चाची सुरवात तीनहात नाक्यापासून होणार असून शेवट जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ होणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आसपास लाऊडस्पिकरची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.दोन लाख झेंडे व टोप्यामोर्चाकरिता आचारसंहिता तयार केली असून त्याचे पालन करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत प्रचार केला जात आहे. स्वंयसेवकांचे प्रत्येकी २० जणांचे ग्रुप तयार करण्यात आले असून मोर्चात सहभागी होणाऱ्यांसाठी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पाण्याच्या बाटल्या, २ लाख झेंडे आणि टोप्या आदींचीही व्यवस्था करण्यात आली आहे.