शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात थॅलेसेमियाचे सहा हजार रुग्ण

By admin | Updated: April 7, 2017 05:54 IST

राज्यातील थॅलेसेमिया या अनुवांशिक रक्ताच्या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली

मुंबई : राज्यातील थॅलेसेमिया या अनुवांशिक रक्ताच्या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. थॅलेसेमियाग्रस्तांची संख्या पाच हजार ९८४ झाली आहे. यात बालरुग्णांची संख्या मोठी आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी विधानपरिषदेत दिली.जगन्नाथ शिंदे, हेमंत टकले आणि विद्या चव्हाण यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना सावंत म्हणाले की, अपेक्षेपेक्षा जास्त थॅलेसेमियाचे रुग्ण आढळले आहेत. जिथे आवश्यक आहे, तिथे औषधाचा साठा तत्काळ पोचवला आहे त्यामुळे सरकारी अनास्थेचा प्रश्न येत नाही. औषध खरेदीची निविदा प्रकाशित झाली असून निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. ती पूर्ण होताच गोळयांचा पुरवठा करण्यात येईल.ठाणे जिल्ह्यात ६०० रुग्ण आहेत, एक महिन्यापासून जिल्हयातील सरकारी रुग्णालयांतील थॅलेसेमियाच्या गोळयांचा साठा संपलेला आहे, याकडे जगन्नाथ शिंदे यांनी लक्ष वेधले. यावर उत्तर देताना सावंत म्हणाले, ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक यांना स्थानिक स्तरावर औषधे खरेदीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक औषधे मिळण्यात खंड पडू नये, यासाठी जाहीर निविदा प्रक्रिया करून दर करार करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील जिल्हा सरकारी रुग्णालयातही थॅलेसेमिया आजारासंबंधी रक्तचाचणी करण्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी सरकार आग्रही आहे. यासंबंधी लवकरच बैठक होईल, असे आश्वासन सावंत यांनी दिले. (प्रतिनिधी)