शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
3
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
4
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
5
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
6
भयंकर! सुनेने रील बनवताच सासरच्या मंडळींना राग अनावर; संतापलेल्या सासऱ्याने फोडलं डोकं
7
मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."
8
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
9
ज्योतीची साथीदार, एकत्रच करत होत्या पाकिस्तान वाऱ्या; कोण आहे प्रियंका सेनापती?
10
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
11
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
12
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
13
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
14
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
15
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
17
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
18
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
19
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा
20
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल

उपसभापतीपदी काँग्रेसचे ठाकरे !

By admin | Updated: August 6, 2016 05:02 IST

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची आज बिनविरोध निवड झाली.

मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापतीपदी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची आज बिनविरोध निवड झाली. भाजपाचे भाई गिरकर यांनी मतदान प्रक्रिया सुरू होत असताना उमेदवारी मागे घेतल्याने ठाकरे यांचा उपसभापती पदाचा मार्ग मोकळा झाला. ठाकरे हे विधानसभेचे सदस्यही राहिले असून राज्याचे गृह राज्यमंत्रीपद त्यांनी सांभाळले आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सर्वात जास्त काळ राहिलेले आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे विधान परिषदेत आल्यानंतर पक्षाचा किल्ला लढविण्याचे काम करीत असताना आता तुलनेने सौम्य स्वभावाचे असलेले ठाकरे हे उपसभापती झाले आहेत. उपसभापती पदासाठी भाजपाकडून कालच भाई गिरकर यांचे नाव देण्यात आले होते. आज सभागृहात मतदान प्रक्रि या सुरु होताच भाजपचे सुजितसिंह ठाकूर यांनी गिरकर यांची उमेदवारी मागे घेत असल्याचे जाहीर केले, यावेळी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी ठाकरे यांची एकमताने निवड झाल्याचे जाहीर केले. या आधी उपसभापतीपद हे राष्ट्रवादीचे वसंत डावखरे यांच्याकडे होते. डावखरे यांचा ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अलिकडेच पराभव झाल्यापासून हे पद रिक्त होते. उपसभापतीपदासाठी काँग्रेसकडून ज्येष्ठ सदस्य माणकिराव ठाकरे तर भाजपकडून विजय उर्फ भाई गिरकर यांनी उमेदवारी अर्ज काल भरला होता. विधान परिषदेतील संख्याबळानुसार काँग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवार माणकिराव ठाकरे यांची निवड बिनविरोध होण्याची शक्यता असतानाच भाजपने उमेदवार उभा केल्याने सभागृहात मतदानाची प्रक्रि या पार पडली. विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस आण िकाँग्रेसचे संख्याबळ सत्ताधाऱ्यांपेक्षा अधिक आहे. सध्या सभापती आणि विरोधी पक्षनेता ही दोन्ही पदे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. तर आघाडीतील सूत्रानुसार उपसभापतीपद काँग्रेसला देण्याचे ठरले होते. गेल्या महिन्यात विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यायच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने दोन उमेदवार दिले होते. तर काँग्रेसने एकच उमेदवार दिला होता. संख्याबळानुसार दोन्ही पक्षांचे एकेक उमेदवार सहज निवडून येतील असे चित्र होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे दुसरे उमेदवार विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची जागा धोक्यात आली असती. मात्र, त्यावेळी मतदान झाल्यास काँग्रेसने त्यांच्याकडील अतिरिक्त मते राष्ट्रवादीला देण्याचे कबूल केले होत आणि त्या बदल्यात राष्ट्रवादीने उपसभापतीपद काँग्रेससाठी सोडायचे अशी तडजोड झाली होती. (विशेष प्रतिनिधी)>काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवल्याने त्यांची उपसभापतीपदी निवड होणार हे निश्चित झाले होते. ठाकरे यांचे सभापतीसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, सुनील तटकरे आदींनी त्यांचे अभिनंदन केले. विधान परिषदेचे सभापती, उपसभापती पदही आता विरोधी पक्षांकडे आले आहे.