शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरेंचा नवा बंगला, 'मातोश्री-2' च्या बांधकामाला सुरूवात

By admin | Updated: March 28, 2017 17:58 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नवा बंगला बांधत आहेत. 'मातोश्री' बंगल्याजवळ कलानगरमध्येच ही आलिशान सहा मजली इमारत

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नवा बंगला बांधत आहेत. 'मातोश्री' बंगल्याजवळ कलानगरमध्येच ही आलिशान सहा मजली इमारत उभी राहत आहे. उद्धव ठाकरे यांनी ऑक्टोबर 2016 मध्ये कलानगरमधील एक प्लॉट 11.60 कोटी रुपयांना खरेदी केला होता. त्यातील 10 हजार चौरस फुटांपेक्षा जास्त जागेवर ते आपलं नवं घर बांधत आहेत. मुंबई मिरर’ने याबाबत वृत्त दिलं आहे.
'तलाटी अँड पांथकी' ही प्रसिद्ध आर्किटेक्चर कंपनी ही इमारत बांधत आहे.या इमारतीत बेसमेंट, स्टिल्ट आणि सहा मजले आहेत. त्यातील प्रत्येक फ्लॅटमध्ये पाच बेडरुम, एक स्टडी रुम, असणार आहे.  या जागेवर कलाकार के. के. हेब्बर राहत होते. १९९६मध्ये त्यांचं निधन झाल्यानंतर ही जागा त्यांची पत्नी सुशीलाच्या नावावर झाली होती.  
2007 साली सुशीला यांच्या मुलांनी ही जागा प्लॅटिनम इंफ्रास्ट्रक्चरला 3.5 कोटी रुपयांमध्ये विकली. प्लॅनेटियमचे मालक राजभूषण आणि जगभूषण दीक्षित यांनी या जागेवर आठ मजली इमारत बनवण्याची परवानगी घेतली होती. प्लॅटिनमने त्यांच्या प्रोजेक्टसाठी हेब्बार कुटुंबाचा दोन मजली बंगला पाडला. 2016 मध्ये जागा विकण्याची परवानगी प्लॅटिनमला मिळाली. या मोबदल्यात मिळणारी 50 टक्के रक्कम राज्य सरकारला दिली जावी, या अटीवर प्लॅटिनमला एप्रिल 2016 मध्ये हस्तांतरणाची परवानगी देण्यात आली. त्यानंतर, या जमिनीच्या अधिग्रहण आणि पुनर्विकासासाठी ठाकरे कुटुंबाने कलानगर सहकारी सोसायटीकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेतलं आणि ऑक्टोबर 2016 मध्ये ठाकरे कुटुंबियांनी ही जागा 11.60 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली.
ही जागा खरेदी करताना ठाकरे कुटुंबाने प्लॅनेटियम कंपनीला 5.8 कोटी रुपये मोजले आणि 5.8 कोटी रुपये उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात जमा केले. याव्यतिरिक्त स्टॅम्प ड्युटीसाठी 58 लाख रुपयेही ठाकरे कुटुंबानेच  भरले. त्यानंतर तात्काळ 17 ऑक्टोबर 2016 रोजी मुंबई महापालिकेने ठाकरे कुटुंबियांनी बांधकामाची परवानगी दिली.