शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “शाई कुठं वापरायची याचं भान पाहिजे, भाजपची विचारधारा हरविण्यासाठी प्रयत्न करेन”: सुषमा अंधारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 17:39 IST

Maharashtra News: सर्व महापुरुषांचा ठरवून अवमान केला जातोय. महापुरुषांचा अवमान करणारी विचारधारा पराभूत केली पाहिजे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics: भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी देणगी मागून म्हणजेच भीक मागून शाळा चालवल्याचे वादग्रस्त विधान केले होते. याचा राग मनात धरून काही कार्यकर्त्यांनी चिंचवड येथे चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकली. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शाईफेकीच्या घटनेचा निषेध केला असला, तरी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्रही सोडले आहे. यातच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही यावर प्रतिक्रिया देताना, शाई कुठे वापरायची याचे भान पाहिजे, असे म्हटले आहे. 

आमच्या घामाच्या पैशातून योजना निर्माण होतात. या योजनांवर तुम्ही श्रेयवादाच राजकारण करण्याची काही गरज नाही. हे लोकांचे पैसे लोकांच्या सोयीसाठीचे आहेत. लोकांसाठी वापरले गेले आहेत. तुम्ही कर्म धर्म संयोगाने त्या खुर्चीवर आहात. याचा अर्थ तुम्ही भाग्यविधाता असल्याचं थाटात वावरायचे काही कारण नाही, या शब्दांत सुषमा अंधारे यांनी हल्लाबोल केला. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाचा निषेध संसदीय मार्गाने केला आहे, असेही त्या म्हणाल्या. 

भाजपची विचारधारा हरविण्यासाठी प्रयत्न करेन

चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य प्रचंड दुर्दैवी आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाच्या अखित्यारीत असणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्रसाधन प्रकाशन समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. यावर चंद्रकांत पाटील यांनी माझ्याशी चर्चा केली. दोन घटना वेगवेगळ्या ठेवा. समितीबाबत काही बोललेलो नाही. तुमच्या कामाबाबतही काही बोललेलो नाही. तुम्ही राजीनामा का देत आहेत, तो देऊ नका, अशी विनंती चंद्रकांत पाटील यांनी केली. मात्र, मी माझा निषेध संसदीय पद्धतीने व्यक्त केला आहे. शाई कुठे वापरायची याचे भान मला आले पाहिजे. ती शाई किती जास्त बोटांना लागते याचा विचार करेन. भाजपची विचारधारा हरविण्यासाठी बॅलेट बॉक्समधून ती शाई कशी वापरता येईल. यासाठी प्रयत्न करेन, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, महापुरुषांचा अवमान करणारी विचारधारा पराभूत केली पाहिजे. रक्ताचा एकही थेंब न सांडता क्रांतीचा मार्ग हा बॅलेट बॉक्समधून जातो. त्यातून ती शाई वापरली गेली पाहिजे. भाजपच्या वेगवेगळ्या नेत्यांकडून महापुरुषांचा अपमान केला जातो. यावर उपमुख्यमंत्री चकार शब्दाने बोलत नाहीत. निंदाजनक प्रस्ताव मांडायला हवा होता. पण, असे करण्यात आलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून सर्व महापुरुषांचा ठरवून अवमान केला जातो, असा मोठा आरोप करत,  राज्यपाल कोश्यारी कशाच्या आधारावर बोलत होते. प्रसाद लाड किंवा मंगलप्रभात लोढा कशाच्या आधारावर बोलत होते. ही सर्व मंडळी भाजपचीच का आहे, अशी विचारणा सुषमा अंधारे यांनी केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेchandrakant patilचंद्रकांत पाटील