शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

नाशिकच्या नव्या ‘तेलगी’कडे बनावट नोटांचा छापखाना!

By admin | Updated: December 27, 2016 04:37 IST

१ कोटी ३५ लाख रुपयांच्या बनावट नोटा प्रकरणी अटकेत असलेला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता छबू नागरे याचा बनावट नोटा छापण्याचा कारखानाच असल्याचे तपासात निष्पण्ण

नाशिक : १ कोटी ३५ लाख रुपयांच्या बनावट नोटा प्रकरणी अटकेत असलेला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता छबू नागरे याचा बनावट नोटा छापण्याचा कारखानाच असल्याचे तपासात निष्पण्ण झाले असून, तो किमान दोनशे कोटींच्या बनावट नोटा छापण्याच्या तयारीत होता. त्याच्याकडील अत्याधुनिक छपाई यंत्रणा बघून पोलीसही अचंबित झाले. हे प्रकरण म्हणजे देशभर गाजलेल्या स्टॅम्प घोटाळ्यातील तेलगीची पुनरावृत्तीच मानली जात आहे.नाशिकमध्ये गेल्या गुरुवारी पोलिसांनी १ कोटी ३५ लाख रुपयांच्या नोटा जप्त केल्या. या प्रकरणी छबू नागरेसह ११ जणांना अटक केल्यानंतर रोज नवी माहिती समोर येत आहे. नागरेकडून २०० कोटींच्या बनावट नोटांची छपाई केली जाणार होती, अशी माहितीही आता समोर आली आहे. मात्र, तत्पूर्वीच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. नाशिक शहरातील खुटवड नगरमधील नागरे याच्या ओसम ब्युटीपार्लरमध्ये ही छपाई केली जात होती. पोलिसांनी तिथून प्रिंटर, स्कॅनर, शाई हस्तगत केली आहे . तरीही राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नाहीसमांतर चलन छापणे हा राष्ट्रद्रोह असला तरी नाशिक पोलिसांनी अद्याप छबू नागरेवर तसा गुन्हा दाखल केलेला नाही.गुन्ह्याचे स्वरूप आणि उद्देश बघून त्याबाबत निर्णय घेता येतो, असे तपासी पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तसेच यासंदर्भात घटना आणि अन्य तरतूदी तपासून गुन्हा दाखल करू असे पोलीस सांगत आहेत. नोटा खपविण्याची शक्कलछबू नागरे याने अ‍ॅक्सेस मायक्रो फायनान्स मल्टीस्टेट को आॅप सोसायटीची स्थापना केली आहे. बनावट नोटा खपविण्यासाठी या सोसायटीचा वापर केला जात असल्याचा संशय असून नागरे याची पत्नी प्रीती नागरे या सोसायटीची शाखा व्यवस्थापक आहे. त्यामुळे या संस्थेमार्फत दिल्या गेलेल्या नोटांबद्दल सभासदांबरोबरच व्यवहारकर्त्यांमध्ये संशय निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी) कोण आहे हा छबू नागरे?छबू नागरे याचा पक्षाशी संबंध नसल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला असला तरी नागरे आजही राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचा पदाधिकारी आहे. शिवाय, निमा या उद्योजकांच्या संघटनेवर विशेष कार्यकारिणी सदस्य म्हणूनही तो कार्यरत आहे. नागरे याच्यावर एमपीएससीचे पेपर फोडल्याचा गुन्हाही दाखल झालेला आहे. तेलगी, स्टॅम्प अन् नाशिककोट्यवधींच्या मुद्रांक घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार अब्दुल करिम तेलगीचे नाशिकशी असलेले संबंध जगजाहीर होते. त्यालाही राजकीय वरदहस्त होता, असे मानले जात होते.बनावट नोटा प्रकरणी अटकेत असलेला छबू नागरे हाही नाशिकचा असून हा निव्वळ योगायोग आहे का, अशी चर्चा आहे.