शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

15 फेब्रुवारी ते 4 मार्चदरम्यान दहावीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी

By admin | Updated: January 24, 2017 19:57 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/ मार्च 2017 मध्ये घेण्यात येणा-या दहावीच्या

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 24 - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/ मार्च 2017 मध्ये घेण्यात येणा-या दहावीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची कल चाचणी घेतली जाणार आहे. मंडळाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक / तोंडी 15 फेब्रुवारी ते 4 मार्च या कालावधीत होणार आहे. त्याच कालावधीत विद्यार्थ्यांची कल चाचणी घेतली जाईल,असे राज्य मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.राज्य शासनाने दहावीच्या परीक्षेस प्रविष्ट होणा-या विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय कल चाचणी घेण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार गेल्या वर्षी दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांची कल चाचणी घेण्यात आली. त्यास विद्यार्थी व शाळांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. यंदा दहावीच्या परीक्षेस प्रविष्ट होणा-या विद्यार्थ्यांची कल चाचणी घेतली जाईल. त्याचा अहवाल एप्रिल 2017 मध्ये आॅनलाईन स्वरुपात तसेच विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर छापील स्वरुपात देण्यात येईल. त्यामुळे सर्व शाळांनी कल चाचचणीसाठी संगणक सुविधा तयार ठेवावी. प्रत्येक शाळेने कल चाचणीच्या कामासाठी शाळेतील एका शिक्षकाची नियुक्ती करावी. तसेच त्याबाबतची माहिती मंडळाच्या संकेतस्थळावर नोंदवावी. शाळांनी संगणक उपलब्धतेप्रमाणे विद्यार्थ्यांचे गट तयार करावेत. त्याच प्रमाणे नियोजित कालावधीत चाचणी घेण्याचे काम पूर्ण करावे. कल चाचणीस हजर राहणा-या विद्यार्थ्यांची उपस्थिती पत्रकात स्वाक्ष-या घेणे अनिवार्य असून प्रात्यक्षिक / तोंडी परीक्षांच्या गुणपत्रकाबरोबर स्वाक्षरीची पत्रके विभागीय मंडळात जमा करणे बंधनकारक आहे. कल चाचणीचे साहित्य वितरण, प्रवेशपत्र वितरणाबरोबर केले जाणार आहे,असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.