शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडाच्या सदनिका सोडतीस अर्ज सादर करण्याकरिता 22 ऑक्टोबरपर्यंत मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 18:29 IST

मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक)  मुंबई विभागातील विविध वसाहतीतील ८१९ सदनिकांच्या विक्रीसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीस अनुसरून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

मुंबई : मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक)  मुंबई विभागातील विविध वसाहतीतील 819 सदनिकांच्या विक्रीसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीस अनुसरून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नोंदणीकृत अर्जदारांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत 22/10/2017 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत असून, अधिकाधिक नागरिकांनी आपल्या गृहस्वप्नपूर्ततेकरिता या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात 10 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. सोडतीकरिता माहितीपुस्तिका व ऑनलाइन अर्ज म्हाडाच्या htpps://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. याच संकेतस्थळावर अर्जदाराची नोंदणी 21/10/2017 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत केली जाणार आहे.  नोंदणीकृत अर्जदारांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास 22/10/2017 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मुदत  देण्यात आली आहे. यंदा प्रथमच अर्जदारांना NEFT / RTGS  द्वारे अनामत रक्कम भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

मुंबईतल्या म्हाडाच्या सुमारे 819 घरांसाठी ही लॉटरी काढण्यात आली आहे. दरवर्षी 31 मे रोजी म्हाडाच्या घरांची लॉटरी काढण्याचा पायंडा आहे. यंदा मे उलटून गेला तरी लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध न झाल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. अनेक जण यंदा लॉटरी नसेल असे कयास बांधूनही मोकळे झाले होते. मात्र यंदा उशीर झाला असला तरीही लॉटरीची जाहिरात दिलेली आहे, असं म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आलंय.

यंदा पवई, चारकोप, विक्रोळी, कांदिवली, गोरेगाव, सायन, मानखुर्द आणि मुलुंड आदी भागांतील घरांसाठी लॉटरी काढण्यात आली आहे. मात्र तरीही जुलै महिन्यातच म्हाडा घरांची यादी प्रसिद्ध करेल, असे म्हाडानं सांगितलं होते. परंतु लॉटरीची जाहिरात गेल्या महिन्यात देण्यात आली. मुंबईत परवडणारं घरं घेणं प्रत्येक व्यक्तीला सहज शक्य होत नाही. त्यामुळे अनेकांना म्हाडाच्या लॉटरीची वाट पाहावी लागते. मात्र यंदा म्हाडाची लॉटरी फक्त 819 घरांसाठी असून, म्हाडाच्या घरांची कमतरता जाणवते आहे. 

टॅग्स :mhadaम्हाडा