शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

पळशी झांशीच्या विकासासाठी तेंडुलकर यांचा पुढाकार!

By admin | Updated: April 14, 2016 01:47 IST

खासदार तेंडुलकर यांनी आपल्या खासदार निधीतून दहा लाख रुपयांची मदत दिली आहे.

संग्रामपूर (जि. बुलडाणा): संग्रामपूर तालुक्यातील आदिवासीबहुल पळशी झांशी या गावात रस्ते व सौर दिव्यांसाठी भारताचा माजी क्रिकेटपटू व विक्रमवीर सचिन तेंडुलकर सरसावला आहे. खासदार तेंडुलकर यांनी आपल्या खासदार निधीतून दहा लाख रुपयांची मदत दिली आहे. या मदतीसंदर्भात पत्र बुलडाणा जिल्हाधिकार्‍यांना ७ एप्रिल रोजी प्राप्त झाले आहे. राज्यसभेच्या खासदारांना स्थानिक क्षेत्र विकास योजनेंतर्गत दरवर्षी पाच कोटी रुपयांचा निधी दिला जातो. राज्यसभेचे नामनिर्देशित खासदार हा निधी देशभरात कोठेही देऊ शकतात. त्यामुळेच पळशी झांशीचे सरपंच अरुण आबाराव मारोडे यांनी थेट सचिन तेंडुलकर यांना पत्र पाठवून गावातील रस्ते व सौर पथदिवे उभारणीसाठी निधीची मागणी करून गावाच्या विकासात योगदान देण्याची विनंती केली होती. खा. तेंडुलकर यांनी या पत्राची तत्काळ दखल घेत १0 लाखांचा निधी वितरित करण्याचा आदेश मुंबई उपनगर विभागाच्या जिल्हाधिकार्‍यांना दिला. या पत्राची प्रत बुलडाण्याच्या जिल्हाधिकार्‍यांना ७ एप्रिलला प्राप्त झाली. विशेष म्हणजे, हा निधी वितरित करण्यास अडचण असल्यास ७५ दिवसांच्या आत माहिती देण्यात यावी व सुचविलेल्या निधीतून सदर प्रकल्प पूर्ण होत नसेल, तर ४५ दिवसांच्या आत कळवावे, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. खा. तेंडुलकर यांच्या या मदतीच्या भूमिकेमुळे पळशी गावात आनंदाचे वातावरण आहे. पाच हजार लोकसंख्येच्या या गावामध्ये तेंडुलकरांनी दिलेल्या निधीतून रस्ते व सौर पथदिव्यांची कामे दज्रेदार होतील, अशी माहिती ग्रामसचिव हेमंत देशमुख यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली.