शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहाराची निविदा पंधरा दिवसांत पूर्ण करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 02:34 IST

नागपूर उच्च न्यायालयाचे आदेश : शिक्षण संचालनालयाने दिली मुदतवाढ

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शालेय पोषण आहार पुरवठ्याचे काम प्रचंड दराने देत त्यांनाच सातत्याने मुदतवाढ देण्याचा प्रताप राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून केला जातो. दरवर्षी जानेवारीमध्ये पूर्ण करावयाची ही प्रक्रिया जूनअखेर सुरू केली जाते. चालू वर्षातही सुरू असलेला हा प्रकार रोखून येत्या पंधरा दिवसांत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश नागपूर उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले आहेत. त्यानंतर संचालकांनी २९ जुलैपर्यंत मुदतवाढ देत १५ आॅगस्टपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. शालेय पोषण आहारासाठी तांदूळ आणि इतर वस्तूंचा पुरवठा कंत्राटाची मुदत संपुष्टात येत असताना संबंधित कंत्राटदारांना सातत्याने मुदतवाढ दिली जाते. त्यातून वस्तू पुरवठ्यासाठी जुन्या दराने देयक अदा करून शासनाची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली जाते. हा प्रकार टाळण्यासाठी निविदा प्रक्रिया मुदतीत पार पाडणे, तसेच पुरवठा करावयाच्या वस्तूंचे नमुने निविदा उघडण्यापूर्वीच घेत गुणवत्तेच्या नावाखाली अपात्र करण्याला प्रतिबंध घालावा, या मागणीसाठी नागपूर उच्च न्यायालयात अ‍ॅड. रोहित शर्मा यांच्यामार्फत याचिका दाखल करण्यात आली. विशेष म्हणजे, ही निविदा प्रक्रिया दरवर्षी जानेवारीपासून राबविण्यास सुरुवात होणे आवश्यक आहे; मात्र शिक्षण संचालक स्तरावरून तसे न करता कंत्राटाची मुदत संपण्याच्या कालावधीत निविदा प्रक्रिया मे किंवा जूनपासून सुरू केली जाते. त्यातून कंत्राटदारांचे उखळ पांढरे केले जाते. तीन तारखांवर राज्याच्या शिक्षण संचालकांनी न्यायालयात बाजू मांडली नाही. त्यानंतर १७ जुलै रोजीची सुनावणी १८ जुलै रोजी झाली. त्यामध्ये न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी, रोहित देव यांनी सध्या सुरू असलेली प्रक्रिया १५ दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाला दिले आहेत. आता कंत्राटदारांना मुदतवाढीचा मलिदा मिळण्यास अडचण झाली आहे.अधिकाऱ्यांचे पत्रयुद्धगेल्यावर्षी बाजारभावाच्या तब्बल दोनशे टक्केपेक्षाही अधिक दराच्या वस्तू पुरवठ्याला मंजुरी देत शासनाचे कोट्यवधींचे नुकसान करण्याचा प्रकार शिक्षण विभागाकडून होत आहे. त्यामुळे यावर्षी मे २०१७ मध्ये कंत्राट संपताच मुदतवाढ न देण्याचे पत्र कक्ष अधिकारी प्रमोद पाटील यांनी दिले. त्या पत्राला न जुमानता जुन्या दोनशे टक्के अधिक दराने काम करणाऱ्या कंत्राटदारांना जून, जुलै महिन्याचा पुरवठा करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत.