शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

भाडेकरूंना वाऱ्यावर सोडून कर्जवसुली नाही

By admin | Updated: January 28, 2016 01:30 IST

बँका आणि वित्तीय कंपन्यांच्या थकित कर्जांची सक्तीने वसुली करण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या ‘सरफेसी’ कायद्याचा बडगा उगारून राज्य सरकारच्या भाडे नियंत्रण कायद्यानुसार

मुंबई : बँका आणि वित्तीय कंपन्यांच्या थकित कर्जांची सक्तीने वसुली करण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या ‘सरफेसी’ कायद्याचा बडगा उगारून राज्य सरकारच्या भाडे नियंत्रण कायद्यानुसार महाराष्ट्रातील भाडेकरूंना मिळालेले संरक्षण हिरावून घेता येणार नाही, असा निकाल देऊन सर्वोच्च न्यायालयाने भाडेकरूवर्गाला मोठा दिलासा दिला आहे.‘सेक्युरिटायझेशन अ‍ॅण्ड रिकन्स्ट्रक्शन आॅफ फिनान्शियल अ‍ॅसेट््स अ‍ॅण्ड एन्फोर्समेंट आॅफ सेक्युरिटी इन्टरेस्ट अ‍ॅक्ट’ (सरफेसी कायदा) नुसार थकित कर्जदाराने तारण म्हणून ठेवलेल्या स्थावर मालमत्तेचा दंडाधिकाऱ्यांमार्फत सक्तीने ताबा घेण्याचा अधिकार बँकाना आहे. थकित कर्जदार घरमालक असेल व त्याने तारण ठेवलेल्या इमारतीत भाडेकरू असतील तर बँका अशा इमारतींचा ताबा घेताना ‘सरफेसी’ कायद्याचा आधार घेऊन तेथील भाडेकरूंनाही सक्तीने घराबाहेर काढू शकतात का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. व्ही. गोपाल गौडा व न्या. अमिताभ रॉय यांच्या खंडपीठाने याचे उत्तर ठामपणे नाही, असे दिले आहे.ज्यात भाडेकरू राहतात अशा थकित कर्जदाराने तारण म्हणून ठेवलेल्या मुंबईतील काही इमारतींचा लिलाव पुकारण्यासाठी सक्तीने खाली करून घेण्याचे आदेश बँक आॅफ इंडियाने मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांकडून घेतले होते व उच्च न्यायालयानेही ते कायम केले होते. याविरुद्ध विशाल कलसारिया व इतर भाडेकरुंनी केलेली अपिले मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला.घरमालकांच्या मनमानीपासून भाडेकरूंना संरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने कल्याणकारी असा भाडे नियंत्रण कायदा केलेला आहे. त्यामुळे संदर्भित प्रकरणाप्रमाणे ज्यावेळी या दोन्ही कायद्यांमध्ये विसंगतीची स्थिती येते तेव्हा कोणता कायदा वरचढ मानायचा, असा प्रश्न न्यायालयापुढे होता. ‘सरफेसी’ कायदाच वरचढ मानायला हवा, हे बँकेचे म्हणणे सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केले.दोन्ही कायदे पूर्णपणे भिन्न विषयांशी संबंधित आहेत व त्यांची कार्यक्षेत्रेही स्वतंत्रच मानायला हवीत. भाडे नियंत्रण कायदा हा एक लोककल्याणकारी कायदा असल्याने त्याचा अर्थही त्याच भावनेने लावायला हवा. भाडे नियंत्रण कायद्याच्या बंधनांमुळे घरमालकास मनमानी करता येत नाही ती ‘सरफेसी’ कायद्याच्या आडून करू दिली तर भाडे नियंत्रण कायदा देशभरातून हद्दपार होईल. तसे झाल्यास भाडेकरूंना कायद्याचे कोणतेही संरक्षण राहणार नाही. घरमालक केव्हाही इमारत बँकेकडे गहाण ठेवेल व त्याने कर्ज फेडले नाही की केव्हाही घर सोडून जाण्याची भीती भाडेकरूंच्या मनात सतत राहील. कर्जवसुलीसाठी बँकांना ‘सरफेसी’ कायद्याने अधिकार दिला म्हणून भाडे नियंत्रण कायद्याचे संरक्षण असलेल्या भाडेकरूंना असे वाऱ्यावर सोडता येणार नाही, असे न्यायालयाने निक्षून सांगितले. (विशेष प्रतिनिधी)संघराज्य व्यवस्थेवर घाला‘सरफेसी’ कायदा भाडे नियंत्रण कायद्याहून वरचढ असल्याने न मानण्याचे आणखी एक कारण विषद करताना न्यायालय म्हणते की, हे दोन्ही कायदे अनुक्रमे केंद्रीय संसद व राज्य विधिमंडळाने आपापले अधिकार वापरून केले आहेत. हे दोन्ही कायदे पूर्णपणे वेगळ््या विषयांशी संबंधित आहेत. केंद्राने केलेल्या कायद्याने अशा प्रकारे राज्याने केलेला कायदा अप्रत्यक्षपणे निष्प्रभ होऊ दिला, तर त्याने संघराज्य व्यवस्थेसही धक्का पोहोचेल. संघराज्य व्यवस्था हा राज्यघटनेचा मुख्य गाभा आहे व त्यानुसार संसद व राज्य विधिमंडळांना विवक्षित विषयांशी संबंधित कायदे करण्याचा संपूर्ण अधिकार आहे.