शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
5
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
6
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
7
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
8
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
9
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
10
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
11
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
12
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
13
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
14
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
15
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
16
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
17
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
18
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
20
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला

ट्रक टर्मिनस खातेय दहा वर्षे गटांगळ्या

By admin | Updated: October 31, 2016 03:58 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेने आधारवाडीनजीक बीओटी तत्वावर ट्रक टर्मिनस विकसित करण्याचे कंत्राट एका खाजगी कंपनीला दिले.

मुरलीधर भवार,

कल्याण- शहारातील गर्दी कमी करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने आधारवाडीनजीक बीओटी तत्वावर ट्रक टर्मिनस विकसित करण्याचे कंत्राट एका खाजगी कंपनीला दिले. दोन वर्षांत ते पूर्ण करण्याचा करार झाला, पण दहा वर्षांनंतरही तो प्रकल्प रखडला आहे.प्रकल्प रखडण्यासाठी कंपनीला दोषी धरून पालिकेने त्यांना दर दिवशी पाच हजार रूपये दंडाची नोटीस बजावली आहे, तर कंत्राटदाराने प्रकल्प रखडण्यास पालिका जबाबदार असल्याचे खापर फोडत दंड भरण्यास नकार दिला आहे. या वादात प्रकल्प रखडल्याने आता नवा कंत्राटदार शोधण्याची प्रक्रिया सुरू आहे. वाहतुकीसाठी कल्याण हे जंक्शन असल्याने भिवंडी बायपासहून दुर्गाडी येथे येणारा रस्ता, कल्याण-मुरबाड बाह्यवळण रस्ता, कल्याण-मुरबाड- माळशेजमार्गे नगर, कल्याण-बदलापूर-कर्जत, कल्याण-शीळ अशा वेगवेगळ््या रस्त्यांतील वाहतूक या शहरात एकवटते. जेएनपीटी बंदरातून शीळ-पनवेल मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक होते. शिवाय एपीएमसी, स्थानिक बाजारपेठांतही ट्रक-अवजड वाहने येतात. त्यांच्यासाठी टर्मिनस व्हावे यासाठी २००५ मध्ये पालिकेने बांधा-वापरा-हस्तांतरित करा या तत्वावर ट्रक टर्मिनस विकसित करण्याचा निर्णय घेतला. एसएम असोशिएट अ‍ॅण्ड बिल्डरची निविदा मंजूर झाली. दोन वर्षांत टर्मिनस बांधायचे आणि दहा वर्षे वापरायचे असे त्या करारात होते. ट्रक टर्मिनससाठी पालिकेने कंत्राटदाराला २८ हजार ३४० चौरस मीटरची जागा दिली होती. कंत्राटदार कंपनीने २४ महिन्यात ट्रक टर्मिनससह तेथे हॉटेल, व्यापारी गाळे, हॉस्पिटल, गोडाऊन आदी विकसीत करणे अपेक्षित होते. मात्र दहा वर्षांत ते झाले नाही. पालिकेनेही त्याकडे लक्ष दिले नाही. आता दंडाची नोटीस पाठवली आहे. मात्र पूर्वलक्ष्यी प्रभावाने दंड आकारता येत नसल्याने नोटिशीच्या तारखेपासून तो लागू होईल. >डम्पिंग हाच अडथळादिरंगाईचे खापर कंत्राटदाराने पालिकेवरच फोडले आहे. जागा उशिरा ताब्यात मिळाली, त्यामुळे कामाचे नियोजन करता आले नाही. शिवाय प्रकल्पाशेजारच्या आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडच्या दुर्गंधीमुळे मजूर पळून गेले, प्रकल्पासाठी बांधण्यात आलेली संरक्षक भिंत कचऱ्याच्या ढिगाऱ्याने कोसळली, पालिकेने डम्पिंगच्या गाड्या प्रकल्पात घुसवल्या, त्यामुळे प्रकल्प मार्गी लावता आला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.