शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

तात्पुरता मद्य परवाना रद्द, निर्णय उत्पादन शुल्क विभागाने घेतला निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 04:52 IST

पार्टी वा इतर कार्यक्रमांसाठी एक दिवसाचा दारू विक्री परवाना मिळवून त्याआड दररोज सर्रास दारू विक्री करणारे क्लब, हॉटेल्सना दणका देत यापुढे असे परवानेच न देण्याचा निर्णय उत्पादन शुल्क विभागाने घेतला आहे.

यदु जोशी मुंबई : पार्टी वा इतर कार्यक्रमांसाठी एक दिवसाचा दारू विक्री परवाना मिळवून त्याआड दररोज सर्रास दारू विक्री करणारे क्लब, हॉटेल्सना दणका देत यापुढे असे परवानेच न देण्याचा निर्णय उत्पादन शुल्क विभागाने घेतला आहे.मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये मद्यविक्रीची परवानगीच नसलेले क्लब, लहानमोठ्या हॉटेल्स विशिष्ट कार्यक्रम/पार्ट्यांसाठी एक दिवसाचा तात्पुरता मद्यविक्री परवाना मिळवत. तसा परवाना घ्यायचा आणि त्याआड चक्क बीअरबार चालवायचे प्रकार उत्पादन शुल्क खात्याच्या चौकशीत समोर आले. वेगवेगळ्या नावांनी एकेक दिवसाचे परवाने मिळवून हा प्रकार सर्रास सुरू होता.मुंबईच्या कुलाबा भागात एका आलिशाान हॉटेलने अफलातून शक्कल लढविली. एकेक दिवसांचे मद्यविक्रीचे परवाने मिळवत या हॉटेलमध्ये चक्क ३६४ दिवस मद्यविक्री चालू होती. मध्य मुंबईतील एका बड्या हॉटेलमध्ये आठवड्यातून पाच दिवस दारूविक्री केली जायची.शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळांच्या जवळ असलेले क्लब, हॉटेल्स, डायनिंग हॉल्सना मद्यविक्रीचा स्थायी परवाना मिळू शकत नाही. विशेषत: त्यांनी एक दिवसाच्या मद्यविक्री परवान्याचा मोठ्या प्रमाणात आधार घेतल्याचेही चौकशीत समोर आले आहे.राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी एक परिपत्रक काढून विभागाच्या सर्व अधीक्षकांना असे आदेश दिले आहेत की, अशा आस्थापना जिथे कोणत्याही विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जात नाही. जिथे केवळ व्यावसायिक प्रयोजनासाठी तात्पुरते परवाने घेतले जातात, ज्यांना नियमित मद्यविक्री परवाना जिल्हास्तरीय समितीने यापूर्वी नाकारला होता त्यांना यापुढे मद्यविक्रीचा तात्पुरता परवाना देण्यात येऊ नये.ताडीविक्रीच्या ‘त्या’ निर्णयाचा फेरविचारमुंबई, ठाणे जिल्ह्यात ताडीविक्रीचे परवाने देताना पालघर, रायगड जिल्ह्यात एक हजार ताडाची झाडे दाखवावी लागतील, अशी मुभा उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे. या निर्णयाचा फेरविचार केला जाईल, असे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ताडीविक्रीची ही दुकाने ताडीच्या नावाखाली विषारी द्रव विकतात काय यावर नजर ठेवणारी स्थायी यंत्रणा उभारली जाईल, असे ते म्हणाले. ‘लोकमत’ने हे प्रकरण उचलून धरले होते. एक हजार ताडाची झाडे नसलेल्या भागात ताडीविक्री दुकाने बंद करण्याचा निर्णय घेताना मुंबई, ठाण्याला त्यातून सूट देण्यात आली होती.