मुंबई : राज्यातील थंड हवेची ठिकाणे म्हटले की, महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, चिखलदरा अशा हिल स्टेशनकडे पावले वळतात. मात्र थंड वातावरणासाठी प्रसिद्ध असलेली ही स्थळेही उकाड्याने हैराण झाली आहेत.
एप्रिलच्या दुसऱ्याच आठवड्यात येथील पारा वाढायला लागला आहे. लोणावळ्याचे सोमवारी ३८ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. तर इगतपुरी, तोरणमाळ येथे ३९.०० अंश सेल्सिअसची नोंद झाली.
प्रमुख तीन कारणे कोणती?
- जागतिक तापमानवाढ व उष्ण वाऱ्यांमुळे कमाल तापमान वाढ
- जमिनीचे तापमान वाढत असल्याचा प्रभाव
- प्रेक्षणीयस्थळी वाढलेली वाहतूक, काँक्रिटीकरण आणि बांधकामांमध्ये वाढ
महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणी सरासरी कमान तापमान ३० अंशांपर्यंत असायला हवे. मात्र, उष्ण वारे आणि ग्रीन हाऊस इफेक्टमुळे यामध्ये वाढ होताना दिसत आहे. -प्रा. सुरेश चोपणे, पर्यावरण अभ्यासक