शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

CM एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार? के. चंद्रशेखर राव यांच्या BRSची ठाण्यात होणार एन्ट्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 12:55 IST

K. Chandrashekhar Rao BRS: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात BRS ची एन्ट्री होत असल्याचे सांगितले जात आहे.

K. Chandrashekhar Rao BRS: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यातच तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष महाराष्ट्रात पाय रोवण्याच्या तयारीत आहे. के. चंद्रशेखर राव यांचा प्रभाव ग्रामीण भागात वाढताना दिसून येत आहे. ग्रामीण भागाबरोबर आता शहरातही चंद्रशेखर राव यांचे बॅनर लागल्यामुळे ते चर्चेचा विषय ठरले आहेत.  

के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात हळूहळू पाय रुजवत आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केल्यामुळे राज्यातील मोठ्या पक्षांची काळजी वाढू लागली आहे. पक्ष कार्यालये स्थापन करणे, इतर पक्षांमधील नेत्यांना सामावून घेणे असा मोठा कार्यक्रमच राव यांनी हाती घेतला असून, त्यांच्या महाराष्ट्रातील दौऱ्यातही वाढ झाली आहे. यातच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात के. चंद्रशेखर राव यांची एन्ट्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

उल्हासनगरमध्ये के. चंद्रशेखर राव यांचे बॅनर

ठाणे जिल्हातील उल्हासनगर शहरात के. चंद्रशेखर राव यांचे बॅनर लागले आहेत. उल्हासनगरच्या नेताजी चौकात हे बॅनर लावण्यात आल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या बॅनरच्या बाजूलाच शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे बॅनर लागले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी भारत राष्ट्र समितीच्या नागपूरमधील कार्यालयाचे उद्‌घाटन चंद्रशेखर राव यांच्या हस्ते झाले. नांदेड, सोलापूर, सांगली, संभाजीनगर नंतर नागपूरमध्येही भारत राष्ट्र समितीने पक्ष वाढीवर भर दिला आहे. 

दरम्यान, बीआरएस पक्षाची कार्यालये सुरू करण्यात येत आहेत. याशिवाय, गेल्या काही महिन्यांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपमधील काही नेत्यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला आहे. 

टॅग्स :K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावthaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदे