शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

तेजस एक्स्प्रेस : हेडफोन चोरीवर ‘लोकल’ उपाय

By admin | Updated: May 29, 2017 04:54 IST

अत्याधुनिक वेगवान मुंबई-करमळी सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेसमधील चोरीला आळा घालण्यासाठी, रेल्वेने आता लोकल उपाय योजले

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अत्याधुनिक वेगवान मुंबई-करमळी सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेसमधील चोरीला आळा घालण्यासाठी, रेल्वेने आता लोकल उपाय योजले आहेत. त्यानुसार, प्रवाशांना गाणी आणि चित्रपट ऐकण्यासाठी ब्रँडेड हेडफोनऐवजी लोकल हेडफोन्स देण्यात येणार आहेत. ब्रँडेड हेडफोनची किंमत २०० रुपये आहे. ब्रँडेड हेडफोनप्रमाणे सुविधा देणारे लोकल हेडफोनची किंमत मात्र ३० रुपये आहे.प्रवाशांच्या मनोरंजनासाठी तेजसमध्ये वैयक्तिक एलईडी स्क्रीनमध्ये ‘प्री-लोडेड’ चित्रपट आणि गाणी आहेत. मनोरंजनाचा आनंद घेण्यासाठी ट्रेनमध्ये आयआरसीटीसीच्या वतीने हेडफोन पुरवले जात आहेत. नामांकित कंपनीचे हे ब्रँडेड हेडफोन चोरीला गेल्याने रेल्वेला आर्थिक नुकसान होते, शिवाय पुढील फेरीतील प्रवाशांचीदेखील गैरसोय होते. तेजसमधून आतापर्यंत ३०० हून अधिक हेडफोन चोरीला गेल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे. आयआरसीटीसीने प्रवाशांसाठी ३० रुपये दराने १ हजार हेडफोन खरेदी केले आहेत.‘विमानाच्या सुविधा ट्रेनमध्ये मिळावी’ या धर्तीवर तेजस एक्स्प्रेस बांधण्यात आली होती. त्या वेळी संपूर्ण वातानुकूलित ट्रेनमध्ये प्रवाशांच्या मदतीसाठी अटेंडर, वैयक्तिक एलईडी स्क्रीन, वाचन करण्यासाठी अ‍ॅडजेस्ट होणारे हेडलाईट्स, वाय-फाय अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.एक ट्रेन दोन कंत्राटदार प्रवाशांच्या उत्तम प्रतिसादात तेजस एक्स्प्रेस सुरू आहे. १३ डब्यांमध्ये प्रवासी आसन व्यवस्था असलेल्या तेजसमध्ये एलईडी स्क्रीनमध्ये चित्रपट, गाणी ‘प्री-लोड’ करण्याचे कंत्राट दोन वेगवेगळ््या कंत्राटदारांना देण्यात आले आहे. त्यात आठ डब्यांचे कंत्राट एका कंत्राटदाराला आणि अन्य कंत्राटदाराला उर्वरित डब्यांचे कंत्राट देण्यात आले आहे. यात हिंदी, इंग्रजी चित्रपट, गाणी, गेम्स यांचा समावेश आहे.