शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

‘मातीविना शेती’ हे तंत्र अवलंबावे लागेल

By admin | Updated: January 28, 2017 03:32 IST

उद्योगांसह इतर विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात शेतजमिनी गेल्याने भविष्यात ‘मातीविना शेती’ असा हायड्रोफोनिक शेतीचा प्रयोग

कोल्हापूर : उद्योगांसह इतर विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात शेतजमिनी गेल्याने भविष्यात ‘मातीविना शेती’ असा हायड्रोफोनिक शेतीचा प्रयोग करावा लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले. भीमा उद्योगसमूहाच्या वतीने मेरी वेदर ग्राउंड येथे आयोजित केलेल्या ‘भीमा कृषी - २०१७’ या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी पवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, एकेकाळी अन्नधान्य आयात करणारा भारत आज गहू, साखर, तांदूळ निर्यातीमध्ये आघाडीवर आहे. काळ्या आईची इमानी सेवा करणाऱ्या शेतकऱ्याच्या घामाला योग्य मोबदला मिळाला तर काय होऊ शकते, हेच यातून स्पष्ट होते. उद्योग, रस्ते, रेल्वे, धरणांसाठी जमिनी मोठ्या प्रमाणात गेल्याने शेतीवर बोजा वाढत आहे. यासाठी शेतीसह इतर क्षेत्रांकडे वळले पाहिजे. ब्राझील, कॅनडातील अनेक गावे निव्वळ भारतीय शेतकऱ्यांची आहेत; त्यामुळे जगाच्या पाठीवर कोणत्याही क्षेत्रात उभे राहण्याची तयारी तरुणांनी ठेवली पाहिजे. नोटाबंदीवर सडकून टीका करीत, पवार म्हणाले, नोटाबंदीमुळे शेतीची अर्थव्यवस्था कोलमडली, दूध व्यवसाय तर पूर्ण अडचणीत आला. काळा पैसा आपल्या खात्यात जमा होईल, या आशेने लोक आतापर्यंत शांत होते; पण आता कुरबूर सुरू आहे. मागील तीन वर्षांत नोव्हेंबर ते जानेवारीत ‘नरेगा’वर ३० लाख मजूर कामावर होते. नोटबंदीच्या तीन महिन्यांत त्यांची संख्या तब्बल ८५ लाखांवर गेली. अनेक कंपन्या बंद पडल्याने लाखो तरुण बेरोजगार झाले. यावेळी प्रदर्शनाचे संयोजक खासदार धनंजय महाडिक, महापौर हसिना फरास, आमदार हसन मुश्रीफ, महादेवराव महाडिक यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)