शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

राज्यातील दुष्काळाची पाहणी न करताच परतले केंद्राचे पथक - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 06:51 IST

केंद्र सरकारच्या पथकाने केवळ मराठवाडा व त्याच्या जवळच्या जिल्ह्यात पाहणी केली. विदर्भात जाऊ नका अशा सूचना राज्य सरकारने दिल्याने हे पथक विदर्भात पाहणी न करताच परतले.

गोंदिया : केंद्र सरकारच्या पथकाने केवळ मराठवाडा व त्याच्या जवळच्या जिल्ह्यात पाहणी केली. विदर्भात जाऊ नका अशा सूचना राज्य सरकारने दिल्याने हे पथक विदर्भात पाहणी न करताच परतले. त्यामुळे शेतकरी अपेक्षित नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहणार असल्याचे राष्टÑवादी काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार यांनी येथे सांगितले.आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसची आघाडीहोईल. शिवाय मित्र पक्षांना सोबत घेतले जाईल. जागा वाटपासंदर्भात कुठलाच संभ्रम नाही. काही अडचणी असल्यास दोन्ही पक्षांचे राष्टÑीय अध्यक्ष आपसात बसून सोडवतील. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येवून महाआघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने वाटाघाटी सुद्धा सुरू आहेत. ताकदीनुसार जागा मिळतील, असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला खा. प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री अनिल देशमुख आदी उपस्थित होते.महाआघाडीने आम्हालागृहित धरू नये- तुपकरवाशिम : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विस्तार प्रचंड वाढलेलाअसून महाआघाडीत आम्ही सहा जागांवर दावा केला आहे. आम्ही एका जागेवर अजिबात समाधानमानले जाणार नसून महाआघाडीने उपकाराची भाषा बोलून आम्हाला गृहित धरू नये, असे ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनीयेथे सांगितले. ‘स्वाभिमानी’ने लोकसभा निवडणुकीसाठी बुलडाणा, वर्धा, माढा, कोल्हापूर, सांगली आणि धुळे या सहा जागांवर दावा केला आहे. त्यावर काँग्रेस, राष्टÑवादी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.धानाला २,५०० रुपये हमीभाव देऊमहाराष्टÑात धानाला केवळ १,७४० रुपये हमी भाव दिला जात आहे. क्विंटलमागे ७०० रुपयांची तफावत आहे. आमचे सरकार आल्यास मध्य प्रदेश आणि छत्तीसगडप्रमाणेच धानाला प्रती क्विंटल २५०० रुपये हमीभाव देऊ, असेही पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार