शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

संघाला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही -  संघाचे राहुल गांधींना प्रत्युत्तर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 21:26 IST

नागपूर, दि. 17 - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रत्युत्तर देण्यात आले आहे. संघाचे ...

नागपूर, दि. 17 - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रत्युत्तर देण्यात आले आहे. संघाचे अनेक स्वयंसेवक प्रत्यक्षपणे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते. काहींना फाशीदेखील झाली. आरोप करणाऱ्या  राहुल गांधींना मुळात संघच माहीत नाही. त्यांचा जनाधार कमी होतो आहे आणि आपले अपयश लपविण्यासाठी ते त्यांच्या आजी व पणजोबांची कामगिरी सांगत आहेत, या शब्दांत संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी त्यांच्यावर टीका केली.नागपुरात ग्रंथालय भारतीच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना त्यांनी संघाची भूमिका मांडली. समाजाला संघटित करण्यासाठी संघ काम करतो. संघ प्रत्यक्ष स्वातंत्र्य लढ्याात सहभागी झाला नाही, मात्र संघाचे स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात आंदोलनात उतरले होते. अगदी महात्मा गांधींच्या जंगल सत्याग्रहात आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे देखील १९३० साली सहभागी झाले होते. मात्र असे करीत असताना त्यांनी सरसंघचालकपदाची जबाबदारी डॉ. परांजपे यांच्याकडे दिली होती. अनेक स्वयंसेवकांना फाशीदेखील झाली होती. मात्र राहुल गांधी हे त्यांना माहीत असलेला इतिहास सांगत आहेत. त्यांना संघदेखील माहीत नाही. तो जे इतिहास जाणतात त्याचा ह्यप्रपोगंडाह्ण करीत आहेत. संघाला कुणाच्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. संघ आपले काम करीत राहील. प्रत्यक्षात ही चर्चाच योग्य नाही, असे वैद्य यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा'इंदिरा'ऐवजी चुकून 'अम्मा' बोलून फसले राहुल गांधी मोदी सरकारनेच पाकिस्तानला दिली कुरापती करण्याची संधी - राहुल गांधी त्यांनी  खरा भारत नाकारला२०१४ पूर्वी देशात पुरोगामित्वाच्या नावाखाली खरा भारत व त्याची संस्कृतीच नाकारण्यात आली. आपण जे आहोत, ते आम्ही नाहीत हे सांगण्याची स्पर्धा होत होती. यात काही विदेशी संस्था व देशातीलच विचारधारा सहभागी होत्या. मात्र भारताला नाकारणाऱ्यांचा जनाधार आता संपत आहे. विरोधात प्रचार होत असतानादेखील संघाची स्वीकारार्हता वाढते आहे, असे डॉ. मनमोहन वैद्य म्हणाले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ