शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शाकाहारी-मांसाहारी भेद केल्यास धडा शिकवू, मनसेचा बिल्डरांना इशारा

By admin | Updated: April 29, 2017 11:17 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईतील सर्व बिल्डरांना मुंबईत घर विक्री करताना शाकाहारी-मांसाहारी असा भेद करु नका, अन्यथा मनसे स्टाईल धडा शिकवू असा इशारा दिला आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईतील सर्व बिल्डरांना मुंबईत घर विक्री करताना शाकाहारी-मांसाहारी असा भेद करु नका, अन्यथा मनसे स्टाईल धडा शिकवू असा इशारा दिला आहे. मनसेने यासंबंधी पत्रक काढत आक्रमक भूमिका घेतली आहे. 
 
"आपल्या इमारतीमधील विकण्यात येणा-या सदनिका या कोणत्याही प्रकारचा जातीधर्माचा, आहारात भेदभाव न करता देण्यात याव्यात", अशी मागणी मनसेने पत्रकातून केली आहे. "आमच्याकडे तुमच्याविरोधात तक्रारी प्राप्त झाल्या असून आपण असे न करता सर्व जाती - धर्माच्या लोकांना आपल्या इमारतीमधील सदनिका विकाव्यात", असं मनसेने बिल्डरांना ठणकावून सांगितलं आहे. "इतकंच नाही याबद्दल आम्हाला हमीपत्र द्यावे, अन्यथा मनसे स्टाईलने धडा शिकवू", असा इशाराच बिल्डरांना देण्यात आला आहे. 
 
मनसे मांसाहाराच्या मुद्यावर आक्रमक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2015 मध्ये दहिसरमध्ये मांसाहार करणाऱ्या कुंटुंबाला सोसायटीतील लोकांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यावेळी मनसेने आक्रमकपणे हा मुद्दा उचलत आंदोलन केलं होतं. त्यामुळे शाकाहारी-मांसाहारीच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा मनसे आक्रमक होताना दिसते आहे.