शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

अनुदानित शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतरांची निवडणुकीतून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 07:09 IST

उच्च न्यायालयाचा दिलासा; पाच दिवसच करावे लागणार काम

मुंबई : खासगी अनुदानित शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची निवडणुकीच्या कामातून सुटका करण्यात आली आहे. न्या. अभय ओक आणि न्या. एम. एस. संकलेचा यांच्या खंडपीठाने शुक्रवारी हा आदेश दिला. यामुळे अनुदानित शाळांतील शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

मतदार याद्यांच्या कामासाठी राज्यातील शाळांच्या शिक्षक, तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कामाला लावले जाते. निवडणुकीच्या कामांत गुंतवून ठेवले जाते. यामुळे शैक्षणिक व कार्यालयीन कामे ठप्प होतात, शिवाय विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो. आदेशांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाईच्या धमक्या दिल्या जातात, असा आरोप करून, निवडणूक आयोगाच्या या आदेशाविरुद्ध शिक्षण मंडळ, गोरेगाव व अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थांच्या पुढाकाराने १0 शाळांच्या चालकांनी २००९ मध्ये याचिका दाखल केली होती. सुनावणीवर न्यायालयाने वरील निर्णय दिला. त्यामुळे खासगी अनुदानित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांची निवडणूक कामातून सुटका झाल्याची माहिती शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष गिरीश सामंत यांनी दिली. याचिकाकर्त्यांच्या वतीने दिलीप बागवे आणि डॉ.वीरेंद्र तुळजापूरकर यांनी बाजू मांडली.

यामुळे अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना यापुढे फार तर पाच दिवसच निवडणुकीचे काम करावे लागेल. \शिकवायलाही वेळ मिळत नाहीसतत निवडणुका होत असतात आणि त्यासाठी खासगी अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना सर्रास कामाला लावले जाते. यामुळे शिकविण्यासाठी शिक्षकांना वेळ मिळत नसल्याचे शिक्षणसंस्थांचे म्हणणे आहे.