शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

शालार्थ प्रणालीत नाव नसल्याने शिक्षकांचे वेतन ६ वर्षांपासून थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 06:04 IST

मुंबई : शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट नसल्यामुळे अनेक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे मागील ६ वर्षांपासूनचे वेतन थकीत आहे. उपसंचालक कार्यालयाकडे ...

मुंबई : शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट नसल्यामुळे अनेक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे मागील ६ वर्षांपासूनचे वेतन थकीत आहे. उपसंचालक कार्यालयाकडे अनेकदा तक्रारी करूनसुद्धा शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्यात न आल्याने अनेक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांवर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.सहा वर्षांपासून वेतन न मिळालेल्या शिक्षकांसाठी स्थापन केलेल्या स्पेशल टास्क फोर्सची बैठक फक्त एकदाच झाली आहे. यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या शालार्थमध्ये नाव नोंदणी करण्याचा व त्यांचा वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्पेशल टास्क फोर्सच्याच सदस्यांनी या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.शालार्थबाबतीत विविध तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्पेशल टास्क फोर्सची स्थापना शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली असल्याची माहिती समितीचे सदस्य एल. एस. दीक्षित यांनी दिली. या समितीमध्ये १६ सदस्यांचा समावेश आहे. याद्वारे शिक्षकांच्या नावनोंदणीमध्ये येणाऱ्या अडचणी त्वरित सोडविल्या जाव्यात आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा वेतनाचा प्रश्न मार्गी लागावा हा हेतू होता. मात्र ९ मार्च रोजी पहिल्या बैठकीनंतर या टास्क फोर्सची कुठलीही बैठक घेण्यात आली नसल्याची माहिती दीक्षित यांनी दिली. त्यामुळे या टास्क फोर्सच्या उद्देशालाच हरताळ फासला गेल्याचे त्यांनी म्हटले आहे.सोबतच राज्यातील सगळ्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या नोंदणीचा प्रश्न सोडविला जावा या हेतूने ८ उपसंचालक कार्यालयांमध्ये या नोंदणी करून घेतल्या जाव्यात अशी सूचनाही टास्क फोर्सच्या समितीतील सदस्यांनी केली होती. मात्र शिक्षण विभागाकडून त्याची कोणतीही दखल घेतली गेली नाही. परिणामी, राज्यातील अनेक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक मागील ६ वर्षांपासून विनावेतन काम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.शिक्षण विभागाच्या या ढिसाळ कारभाराचा निषेध आणि शिक्षकांना त्यांचे वेतन मिळवून देण्यासाठी स्पेशल टास्क फोर्सच्या सदस्यत्वाचा राजीनामा त्यांनी दिला आहे. यापुढे शालार्थ प्रणालीचा फटका बसलेल्या शिक्षकांना वेतन मिळवून देण्यासाठी आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.