ऑनलाइन लोकमतअहमदनगर, दि. ३ : माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सभेत एकमेकांवर धावून जात बोलण्याची संधी मिळावी, यासाठी शिक्षकांनी थेट माईकच तोडला आणि सत्ताधारी शिक्षकांना विरोधी शिक्षकांनी प्रचंड गोंधळात साडीचोळीचा आहेर केला़रविवारी माध्यमिक शिक्षक सोसायटीची वार्षिक सर्वसाधरण सभा झाली़ सभेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोपांची राळ उठविली़ त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी गटाचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले़ जागा खरेदी, नोकर भरती, घटलेला लांभाशप्रकरणी विरोधकांनी सत्ताधारी संचालक मंडळाला धारेवर धरले़ सत्ताधाऱ्यांना साडीचोळीचा आहेर करीत विरोधकांनी आक्रम पवित्रा घेतला़ त्यामुळे सत्ताधारीही आक्रमक झाले़ माईकवर भाषणबाजी करण्यावरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाली़ माईकवरुन बोलायलाच मिळत नसल्यामुळे हा माईकही तोडण्यात आला़
शिक्षक धावले एकमेकांवर; सत्ताधाऱ्यांना दिला साडीचोळीचा आहेर
By admin | Updated: July 3, 2016 16:58 IST