शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाने तोंडात छडी खुपसलेल्या विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 04:50 IST

चार शस्त्रक्रिया; १३ दिवसांपासून अन्नपाणी बंद

अण्णा नवथर ।अहमदनगर : शिक्षकाने तोंडात छडी खुपसल्याने जखमी झालेला कर्जत तालुक्यातील दुसरीचा विद्यार्थी रोहन जंजिरे सध्या पुण्यातील रुग्णालयात आयुष्याशी झुंज देत आहे. त्याच्या अन्ननलिकेत संसर्ग झाल्याने तेरा दिवसांपासून अन्नपाणी बंद आहे.पिंपळवाडी येथे जिल्हा परिषद शाळेत सात वर्षांच्या रोहनला शिक्षा करण्यासाठी शिक्षक चंद्रकांत शिंदे याने त्याच्या तोंडात छडी खुपसली. यात जखमी झालेल्या रोहनवर राशीन व बारामती येथे उपचार करण्यात आले. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर ४ शस्त्रक्रिया झाल्या़उपचार खर्चाचे काय?रोहनचे वडील शेती करतात. त्याच्या उपचारावर आतापर्यंत पाच लाख खर्च झाले आहेत. या कुटुंबाची गटशिक्षणाधिकारी यांच्या व्यतिरिक्त इतर अधिकारी व लोकप्रतिनिधींनी अद्याप दखलही घेतलेली नाही. काही लोकांनी तर शिक्षकाकडून पैसे घ्या व प्रकरण मिटवा असा तगादा लावला आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजश्री घुले यांनी रोहनची भेट घेतली. त्याची अवस्था पाहून त्यांनाही अश्रू अनावर झाले.शिक्षकाला अद्याप अटक नाहीशाळेतील अन्य पाच मुलांच्या तोंडातही शिक्षक चंद्रकांत शिंदे याने छडी खुपसल्याचे पालकांनी कर्जतचे गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे यांना सांगितले. शिंदे यांनी तसा अहवाल जिल्हा परिषदेला दिला आहे. या शिक्षकाला निलंबित करण्यात आले. मात्र, गुन्हा दाखल होऊनही त्याला अटक झालेली नाही. रोहनचे वैद्यकीय प्रमाणपत्र आल्यानंतर गुन्ह्याची कलमे वाढवून पुढील कारवाई करू, असे कारण कर्जत पोलिसांनी दिले आहे.छडी रोहनच्या श्वासनलिकेत गेल्याने नलिकेच्या मागील बाजूस मोठी इजा झालेली आहे़ आतापर्यंत चार शस्त्रक्रिया केल्या़ परंतु,जखमेतून हवा येऊन ती छातीत साचते़ त्यामुळे त्याला अन्नही गिळता येत नसल्याने प्रकृती चिंताजनक आहे़- डॉ़ मुरारजी टी़ घाडगे, पुणे

टॅग्स :Crimeगुन्हा