ओरोस (सिंधुदुर्ग) : पक्षापेक्षा स्वत:ला मोठे समजून इतर पक्षात जाऊन मोठ्या पदावर असणाऱ्या गद्दाराला आगामी नगरपरिषद निवडणुकीत धडा शिकवा, अशी तोफ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांचे थेट नाव न घेता डागली. तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे व अन्य मान्यवर उपस्थित होते. पक्ष बळकट करून निवडणुकीत आपली ताकद दाखवत स्वार्थासाठी पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवा, असे आवाहन त्यांनी केले. (वार्ताहर)
गद्दारांना आगामी निवडणुकीत धडा शिकवा - तटकरे
By admin | Updated: August 22, 2015 23:28 IST