शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात तीन वर्षांत टीबीने घेतले २० हजारावर बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 04:12 IST

राज्यात २०१५ ते २०१७ या तीन वर्षांत क्षयरोगाने (टीबी) तब्बल २० हजार २१३ लोकांचा मृत्यू झाला. क्षयरोग नियंत्रणाचा राज्यात बोजवारा उडाला असून, ‘टीबी हारेगा देश जितेगा’ ही जाहिरात महाराष्ट्रासाठी पोकळच ठरली असल्याची टीका आज विधानसभेत करण्यात आली.

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यात २०१५ ते २०१७ या तीन वर्षांत क्षयरोगाने (टीबी) तब्बल २० हजार २१३ लोकांचा मृत्यू झाला. क्षयरोग नियंत्रणाचा राज्यात बोजवारा उडाला असून, ‘टीबी हारेगा देश जितेगा’ ही जाहिरात महाराष्ट्रासाठी पोकळच ठरली असल्याची टीका आज विधानसभेत करण्यात आली.राज्यात क्षयरोगाचा प्रादूर्भाव वाढत असल्यासंदर्भात पराग अळवणी व अन्य सदस्यांनी आज लक्षवेधी सूचना मांडली होती. तिच्या लेखी उत्तरात क्षयरोगाने तीन वर्षांत २० हजार २१३ बळी घेतल्याची कबुली सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी दिली. २०१५ मध्ये ७६३० (त्यात मुंबई १४५९), २०१६ मध्ये ६८८४ (मुंबई १२४०) आणि २०१७ मध्ये ५६९९ (मुंबई ९६३) असे मृत्यू झाले. क्षयरोग नियंत्रणाबाबत सरकारची यंत्रणा कुचकामी ठरली असल्याची टीका माजी मंत्री एकनाथ खडसे, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, नसीम खान, सपाचे अबू आझमी, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आदींनी केली. भाजपाचे डॉ.राहुल आहेर, अतुल भातखळकर, शिवसेनेचे सुनील प्रभू यांनीही उपप्रश्न उपस्थित केले.क्षयरोगासंदर्भात अधिकचे संशोधन करण्यासाठी जे. जे. रुग्णालयात अत्याधुनिक संशोधन केंद्र सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. या रोगाच्या तपासणीसाठी मुंबईत पाच प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार असून त्यापैकी तीन सुरू असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी स्पष्ट केले.फ्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी चारसुत्री पद्धतीने कार्यक्रम राबविला जात आहे.मुंबई शहरात पूर्व व पश्चिम उपनगरांमध्ये क्षयरुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत असल्याचे सांगून आरोग्यमंत्री म्हणाले की, प्रदुषणामुळे होणाºया क्षयरोगाच्या तपासणीसाठी डॉक्टरांचे विशेष पथक नेमून त्याद्वारे तापसाणी करण्यात येईल. बुलढाण्याचे क्षयरोग रुग्णालय येत्या सहा महिन्यात कार्यान्वित करण्यात येईल. असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबई पूर्व व पश्चिम उपनगरात अधिक रूग्ण-मुंबई शहरात पूर्व व पश्चिम उपनगरात क्षयरूग्ण जास्त प्रमाणात आढळून येत असल्याचे सांगून आरोग्यमंत्री म्हणाले, प्रदुषणामुळे होणाºया क्षयरोगाच्या तपासणीसाठी डॉक्टरांचे विशेष पथक नेमून त्याद्वारे तपासणी करण्यात येईल.