शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

प्राण्यांसाठीही आता टॅक्सीसेवा

By admin | Updated: April 26, 2017 23:48 IST

प्राणिमित्र असलेल्या डोंबिवलीच्या तरुणीने प्राण्यांसाठी टॅक्सीसेवा सुरू केली आहे. या आगळ्यावेगळ्या टॅक्सीसेवेला प्राणिमित्रांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

जान्हवी मोर्ये / डोंबिवलीप्राणिमित्र असलेल्या डोंबिवलीच्या तरुणीने प्राण्यांसाठी टॅक्सीसेवा सुरू केली आहे. या आगळ्यावेगळ्या टॅक्सीसेवेला प्राणिमित्रांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्राण्यांना रुग्णालयात नेणे, प्रवासाला नेणे अधिक सोयीचे झाले आहे. कोपर रोड परिसरात लक्ष्मी अग्रवाल राहते. ती सीए झाली आहे. तिचा टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. लक्ष्मी प्राणिमित्र असून तिच्या मित्रमैत्रिणींनी एक फेसबुक पेज तयार केले आहे. लक्ष्मीने पाहिले की, सरकारी वाहनांतून प्राण्यांना प्रवास करण्यास बंदी आहे. बस, रिक्षातून प्राण्यांना नेण्यास मज्जाव केला जातो. प्राणी इतरांना चावा घेतील, गाडीत घाण करतील, या भीतीपोटी प्राण्यांना प्रवास करून दिला जात नाही. पाळीव प्राणी आजारी पडले, तर त्यांना सार्वजनिक वाहनांतून रुग्णालयात नेता येत नाही. प्राण्यांचा मालक बाहेरगावी जाणार असल्यास त्या प्राण्याला बोर्डिंगमध्ये ठेवण्यासाठीही नेण्यास चालकांकडून नकार दिला जातो. ही समस्या लक्षात घेऊन लक्ष्मीने तिच्या टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सचा उपयोग केला. सुरुवातीला तिने दोन टॅक्सी प्राण्यांसाठी सुरू केल्या. एका प्राण्यासाठी दर किलोमीटरला २५ रुपये भाडे आकारले जाते. सहा महिन्यांपासून तिचा हा प्राणी टॅक्सीसेवा प्रयोग सुरू आहे. सगळ्याच प्राण्यांना या दोन टॅक्सींमधून प्रवास करण्याची मुभा दिली आहे. २४ तास आधी प्रवासासाठी टॅक्सी बुकिंग करावे लागते. काही प्राण्यांना अलीकडेच लक्ष्मीने मुंबई, दिल्ली, वांद्रे, खार आणि पुणे येथवर प्रवास घडवून आणला आहे.