शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

TATA मिहानमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक; नितीन गडकरींच्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 17:36 IST

नागपुरातील काही उद्योजकांनीही टाटा समूहाशी संपर्क साधला होता. गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांना ७ ऑक्टोबरला पत्र लिहून मिहानमध्ये येण्याची विनंती केली होती.

मुंबई - राज्यातील वेदांता, टाटा एअरबस यासारखे प्रकल्प इतर राज्यात गेल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कुरघोडीचं राजकारण सुरू आहे. त्यात टाटा समुह मिहानमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे अशा आशयाचं पत्र टाटा सन्सचे अध्यक्ष नटराज चंद्रशेखरन यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र पाठवून सांगितले आहे. त्यामुळे कुरघोडीच्या राजकारणात महाराष्ट्राला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. ७ ऑक्टोबरला गडकरींनी टाटा समुहाला पत्र लिहिलं होते. त्यावर हे उत्तर देण्यात आले आहे. 

टाटा समुहानं नितीन गडकरींना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट (VED) कौन्सिलच्या सदस्यांसोबत संपर्कात राहून नवीन गुंतवणुकीबाबत योग्य ते मूल्यांकन करेल. त्याचसोबत तुम्हालासुद्धा भेटण्याची इच्छा असल्याचं टाटा सन्सचे अध्यक्ष नटराज चंद्रशेखरन यांनी म्हटलं आहे. १९ ऑक्टोबरला हे पत्र गडकरींना लिहिण्यात आले आहे. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे टाटाचा एअरबस प्रकल्प नागपुरात आणण्यास उत्सुक होते. फडणवीस यांनी मागच्या महिन्यातच याबाबत दिल्लीत चर्चाही केली होती. नागपुरातील काही उद्योजकांनीही टाटा समूहाशी संपर्क साधला होता. गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांना ७ ऑक्टोबरला पत्र लिहून मिहानमध्ये येण्याची विनंती केली होती. मात्र हा टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गेला. 

गडकरींच्या पत्रात म्हटलं होतं की, सेझ आणि बिगर एसईझेड क्षेत्रांचा समावेश असलेली ३००० एकर जमीन आहे. टाटा समूहाच्या कंपन्या नागपूरात गुंतवणूक करू शकतात. सहा राज्यांतील ३५० जिल्ह्यांशी रात्रभर कनेक्टिव्हिटी, जमिनीचे कमी दर, मनुष्यबळाची उपलब्धता आणि गोदाम सुविधा. एअर इंडिया, विस्तारा आणि एअर एशिया नागपूरला ऑपरेशन्स आणि रात्रीच्या पार्किंगसाठी हब बनवून खर्च कमी करू शकतात. मिहानमध्ये एअर इंडियाचे आधीच एमआरओ असल्याने टाटा समूहाची दूरदृष्टी लक्षात घेता, येथे आणखी एमआरओचे नियोजन केले जाऊ शकते असं गडकरींनी सांगितले होते. तर मिहानमध्ये संरक्षण उपकरणाच्या काही कंपन्या आहेत. टाटाचे प्रकल्प नागपुरात आले तर त्याला प्रोत्साहन दिले जाईल.  टाटाची टीम नागपूरात आली तर आम्ही त्यांना पाहणीसाठी मदत करू अशी माहिती वेदचे उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी यांनी दिली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :TataटाटाNitin Gadkariनितीन गडकरी